Mizoram बनले देशातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य; पहा साक्षरतेमध्ये आघाडी वर असलेली टॉप 10 राज्यं कोणती?

भारताच्या Office of the Registrar General of India च्या मते, 7 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत वाचू आणि लिहू शकते आणि समजू शकते ती साक्षर मानली जाते.

Mizoram बनले देशातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य; पहा साक्षरतेमध्ये आघाडी वर असलेली टॉप 10 राज्यं कोणती?
Education | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

Literacy Rate of India 2024 Full List: स्वातंत्र्याच्या वेळी भारताचा साक्षरता दर फक्त 14% होता, जो गेल्या काही वर्षांत सुधारला आहे. जसे लोकांना चांगले शिक्षण मिळाले तशी यामध्ये वाढ झाली आहे.2022 मध्ये देशाने अंदाजे 76.32 टक्के साक्षरता दर गाठला आहे असे Statista दर्शवते. पण डेटा अजूनही सर्वसमावेशक असण्यापासून कमी पडतो, कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये साक्षरता दरांमध्ये लक्षणीय तफावत आहे.

मिझोरमचे मुख्यमंत्री Lalduhoma यांनी आज जाहीर केल्यानुसार, मिझोराम राज्याने "पूर्ण साक्षरता" दर्जा प्राप्त केला आहे. शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या 95% साक्षरता दराच्या मर्यादेला ओलांडले आहे.

2011 च्या जनगणनेनुसार 91.33% साक्षरता दरासह भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक साक्षर राज्य असलेल्या मिझोरमने अलीकडेच 98.2% साक्षरता गाठली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. New National Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4.

Mizoram ने रचला इतिहास

PLFS 2023-24 MoSPI सर्वेक्षणानुसार, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये भारतातील सर्वात कमी साक्षरता दर नोंदवला गेला आहे. जो शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येसाठी अनुक्रमे 72.6% आणि 74.3% होता. 2023-24 या कालावधीत भारतातील एकूण साक्षरता दर, ज्यामध्ये 7 वर्षे आणि त्यावरील वयाच्या सर्व व्यक्ती (पुरुष आणि महिला), ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील लोकांचा समावेश आहे, तो 80.9% आहे.

भारतातील टॉप दहा साक्षर राज्य कोणती?

  1. मिझोरम 98.2%
  2. लक्षद्विप 97.3%
  3. नागालंड 95.7%
  4. केरळ 95.3%
  5. मेघालय 94.2%
  6. त्रिपुरा 93.7%
  7. चंदीगढ 93.7%
  8. गोवा 93.6%
  9. पॉडेंचेरी 92.7%
  10. मणिपूर 92%

बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी, साक्षरता दर हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशक आहे. भारताच्या Office of the Registrar General of India च्या मते, 7 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत वाचू आणि लिहू शकते आणि समजू शकते ती साक्षर मानली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).