Bhajanlal Jatav यांच्या प्रश्नावर मंत्री Ajay Tamta बोल्ड; लोकसभा अध्यक्ष OM Birla म्हणाले 'बसा खाली' (Watch Video)

अजय टाम्टा (Ajay Tamta) असे या मंत्र्याचे नाव आहे. काँग्रेस खासदार भजन लाल जाटव (Bhajanlal Jatav) यांनी विचारलेल्या साध्या प्रश्नाने लोकसभेत ते क्लिन बोल्ड झाले आणि विकेट गमावून बसले. सभागृह अध्यक्ष ओम बिरला (OM Birla) यांचाही नाईलाज झाला. त्यांनी मंत्रिमहोदयांचे म्हणने मध्येच थांबवत पुढचे नाव पुकारले. लोकसभेत नेमके घडले काय? घ्या जाणून.

Ajay Tamta, Bhajanlal Jatav, OM Birla | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

National Highway Declaration Rules: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा एक मंत्री भलत्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. जो सोशल मीडियावरही लोकांच्या ट्रोलिंगचा विषय ठरला आहे. अजय टाम्टा (Ajay Tamta) असे या मंत्र्याचे नाव आहे. काँग्रेस खासदार भजन लाल जाटव (Bhajanlal Jatav) यांनी विचारलेल्या साध्या प्रश्नाने लोकसभेत ते क्लिन बोल्ड झाले आणि विकेट गमावून बसले. केंद्रीय सड़क परिवहन राज्य मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या या मंत्री महोदयांना लोकसभा सदस्यांनी विचारलेला प्रश्नच कळला नाही. परिणामी सभागृह अध्यक्ष ओम बिरला (OM Birla) यांचाही नाईलाज झाला. त्यांनी मंत्रिमहोदयांचे म्हणने मध्येच थांबवत पुढचे नाव पुकारले. लोकसभेत नेमके घडले काय? घ्या जाणून.

मंत्री महोदयांनी वाचली भलतीच माहिती

त्याचे झाले असे, काँग्रेस खासदार भजनलाल जाटव यांनी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात सडक राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याचे नियम काय आहेत? असा साधा, सरळ आणि सोपा प्रश्न विचारला. पण, प्रश्न इतका साधा असूनही मंत्री अजय टाम्टा महोदयांना तो कळलाच नाही. त्यांनी आपल्याकडे असलेली भलतीच माहिती वाचायला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात काही काळ खसखस पिकली. पण, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी बाजू सावरुन घेत मंत्रिमहोदयांना पुन्हा संधीदिली. तरीही मंत्री महोयदयांनी पुन्हा भलतीच माहिती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Om Birla Slammed Deepender Hooda: 'सल्ला देऊ नका, बसा...' ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांना फटकारले, पाहा व्हिडिओ

ओम बिरला यांचाही नाईलाज

मंत्री अजय टाम्टा येवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी चक्क महाराष्ट्राशी संबधीत माहिती वाचण्यास सुरु केली. यावर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना तो प्रश्न नसल्याचे सांगितले. मग तर मंत्रिमहोदयांनी कहरच केला. त्यांनी थेट राजस्थान राज्यातील कोणत्यातरी प्रश्नाबाबत माहिती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. इतका सगळा प्रकार पाहिल्यावर मंत्रिमहोदयांनी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणतीच तयारी केली नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आले. त्यावर मग ओम बिरला यांचाही नाईलाज झाला. त्यांनी मध्येच हस्तक्षेप करत टाम्टा यांचे भाषण थांबवले आणि लोकसभेच्या कामकाजातील पुढचे नाव पुकारले. (हेही वाचा, Rahul Gandhi-PM Modi Handshake Video: राहुल गांधी येताच पीएम मोदींनी हसतमुखानं केलं हस्तांदोलन; संसदेमधला 'हा' व्हिडीओ चर्चेत! (Watch Video))

व्हिडिओ

प्रश्न रस्त्यासंबंधी उत्तर तीर्थस्थळांबाबत

लोकसभेत भजनलाल जाटव यांनी विचारले की, ''सडक को राष्ट्रीय राजमार्ग (National Highway) घोषित करने के नियम क्या हैं? माझ्या लोकसभा मतदारसंघात तीन-तीन तीर्थस्थळे आहेत. मुंबई एक्सप्रेसवे पासून पाहिले तर पिनान, पिनान ते महुआ, महुआ से करौली ते कैलादेवीपर्यंत. त्यामुळे हे मार्ग राष्ट्रीय राज्यमार्ग घोषीत करण्याचा विचार सरकार करत आहोत काय? यावर लोकसभा अध्यक्षांनी तुम्ही तर पीडब्लूडी विभागाचे मंत्री आहात. त्यामुळे आपल्याला तर माहितीच असेल एनएच कसा घोषीत होतो. यावर प्रश्नकर्त्या भजनलाल जाटव यांनीही म्हटले की, 'हो, म्ह  मानदंड काय आहेत'. पण या साध्या प्रश्नावर टाम्टा बोल्ड झाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now