Medical Colleges to Reopen: 1 डिसेंबर किंवा त्यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याची प्रक्रिया सुरू करा; केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश

या दरम्यान, कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Doctors| Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) बुधवारी राज्य सरकारांना 1 डिसेंबर किंवा त्यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालये (Medical Colleges) पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले. या दरम्यान, कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. देशातील कोविड-19 साथीच्या आजारामुळे शैक्षणिक संस्था मार्चपासून बंद आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात, पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाथी पुरेशा प्रमाणात बिगर कोविड बेडदेखील उपलब्ध असावेत.

राजेश भूषण यांचे म्हणणे आहे की, 'सर्व महाविद्यालये केंद्र व राज्य सरकारद्वारे जारी केलेल्या कोविड संसर्गापासून दूर ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक अंतराचे नियम पाळतील.’

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) 1 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने वरील सूचना जारी केल्या आहेत. एनएमसीने म्हटले आहे की, विद्यार्थी व वैद्यकीय महाविद्यालयांकडून आम्हाला अहवाल प्राप्त झाला आहे, ज्यात नमूद केले आहे की सध्याच्या प्रशिक्षकांनी (2020) आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले नाही आणि जर हे प्रशिक्षण पूर्ण झाले नाही, तर ते पदव्युत्तर पदवी परीक्षेस बसण्यास पात्र ठरणार नाही.

आयोगाने असे म्हटले होते की, 2021-2022 शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर-नीट परीक्षा उशिरा होणार आहे, कारण पात्र विद्यार्थी उशिरा प्रशिक्षण पूर्ण करतील. एनएमसीने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे जेणेकरून त्यानुसार 2021-2022 सत्रासाठी पदव्युत्तर-नीट परीक्षा घेण्यात येईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी; 1 डिसेंबर पासून लागू होणार नवे नियम)

एनएमसीने 12 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्रालयाला पत्राद्वारे लिहिले होते की, विलंबित नवीन शैक्षणिक सत्र 2020-21, 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करावे. 2020-2021 शैक्षणिक वर्षाचे नवीन पदव्युत्तर सत्र किमान एक जुलै 2021 पासून सुरू केले जावे.



संबंधित बातम्या