व्हिडिओ: मायावती केस रंगवतात, फेशिअल करतात; मोदी मात्र स्वच्छ कपडे वापरतात: भाजप आमदार

मायावती केस रंगवतात. दररोज फेशिअल (Facial) करतात. पांढरे झालेले केस रंगवून त्या स्वत: तरुण असल्याचे दाखविण्याचाच प्रयत्न करतात.

BJP MLA Surendra Narayan Singh speaking to ANI in Lucknow on Tuesday | (Photo Credits:ANI)

बसप सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांच्यावर टीका करताना भाजप आमदार सुरेंद्र नारायण (BJP MLA Surendra Narayan Singh) यांची जीभ चांगलीच घसरल्याचे पाहायला मिळाले. मायवती यांच्यावर बोलताना सुरेंद्र नारायण (Surendra Narayan Singh) यांनी म्हटले की, मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शौकीन असल्याचा आरोप करतात पण मुळात त्याच शौकीन आहेत. मायावती केस रंगवतात. दररोज फेशिअल (Facial) करतात. पांढरे झालेले केस रंगवून त्या स्वत: तरुण असल्याचे दाखविण्याचाच प्रयत्न करतात, असेही सुरेंद्र नारायण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मयावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. ही टीका करताना मायावतींनी ट्विटमध्ये म्हटले होते की, शाही जीवनात रममान असणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या निवडणुकीवेळी मते घेण्यासाठी स्वत:ला चहावाला म्हटले होते. आता , ते स्वत:ला चौकीदार असल्याचे म्हणत आहे.

दरम्यान, मायावती यांच्या ट्विटनंतर सुरेंद्र नारायण यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मायावती आता 60 वर्षांच्या आहेत. त्या 60 वर्षांच्या असूनही त्यांच्या डोक्याचे केस काळे आहेत. त्या रोज फेशीअल करतात. केसही काळे करतात आणि उलट आमच्या नेत्याला शौकीन म्हणतात. चांगले आणि स्वच्छ कपडे घालनणे हा शौकीनपणा मुळीच नाही, अशी पुस्तीही सुरेंद्र नारायण यांनी जोडली. (हेही वाचा, व्हिडिओ: प्रियंका गांधी 'पप्पू की पप्पी'; केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य)

दरम्यान, कर्नाटकमधील काँग्रेस आमदार बी नारायण यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले. नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही, असे अजब विधान बी नारायण यांनी केले. मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाही, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, असेही हे आमदार महोदय पुढे म्हणाले. राहुल गांधी यांनी कलबुर्गी येथे सोमवारी सभा घेतली. राहुल गांधी सभास्थळी पोहोचायच्या आगोदर नारायण यांनी ही टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सभेला संबोधीत केले.