Maryada Purushottam Shri Ram International Airport वर 6 जानेवारीपासून देशातील महत्त्वाच्या शहरातून विमानं उडणार
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरामध्ये राम लल्लांची मूर्ती स्थापन करून मंंदिराचे लोकार्पण होणार आहे.
अयोद्धेमधील (Ayodhya) रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यापूर्वी अयोद्धा नगरीमध्ये तयारीला वेग आला आहे. अयोद्धेमध्ये Maryada Purushottam Shri Ram International Airport सुरू करण्याची देखील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 6 जानेवारीपासून त्याला सुरूवात होत आहे. या विमानतळाचं उद्घाटन 30 डिसेंबरला Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे.
22 डिसेंबरला Indian Air Force च्या Airbus A320च्या यशस्वी लॅन्डिंगनंतर आता विमानतळ देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडण्याला वेग येणार आहे. विमान प्रवासाद्वाराही जगभरातून नागरिक अयोद्धेमध्ये दाखल होऊ शकणार आहेत. सध्या इंडिगो कडून अयोद्धेचं विमानतळ दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलूरू, चैन्नई आणि गोवा विमानतळाशी जोडले गेले आहे.
अयोद्धेमधील सध्याचं विमानतळ लहान आहे. भविष्यात मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 821 एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधानांकडे त्यासाठीचा पाठपुरावा सुरू करण्यात आल्ला आहे. Special Trains for Ayodhya Ram Mandir: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या .
'6500 स्क्वेअर मीटरच्या विमानतळावर एका तासात दोन ते तीन उड्डाणे उतरू शकतात. 2200 मीटर धावपट्टी तयार केली जाईल जी दुसऱ्या टप्प्यात 3700 मीटरपर्यंत वाढवली जाईल. यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमाने अयोध्येत उतरण्यास मदत होईल,' अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अयोद्धा विमानतळावर प्रत्येक प्रवाशाला रामनगरीच्या संस्कृतीचं दर्शन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरामध्ये राम लल्लांची मूर्ती स्थापन करून मंंदिराचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यासाठी देशा-परदेशातून शेकडो मान्यवर, सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. यामध्ये क्रीडा, राजकारण, समाजकारण ते अध्यात्म क्षेत्रातील रथी महारथींचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)