Marathi Memes Spardha 2022: 'मराठी मिम्स बनवा, बक्षीस जिंका'; निवडणूक आयोगाकडून खास स्पर्धा

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आणि मिम्स बनविण्यात तरबेज असणाऱ्या मंडळींसाठी खास ऑफर आहे. विशेष म्हणजे ही ऑफर चक्क भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी खास 'मीम स्पर्धा' (Marathi Memes Spardha 2022) आयोजित केली आहे. या स्पर्धेंतर्गत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमधून क्रमांक काढले जाणार आहेत.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आणि मिम्स बनविण्यात तरबेज असणाऱ्या मंडळींसाठी खास ऑफर आहे. विशेष म्हणजे ही ऑफर चक्क भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी खास 'मीम स्पर्धा' (Marathi Memes Spardha 2022) आयोजित केली आहे. या स्पर्धेंतर्गत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमधून क्रमांक काढले जाणार आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या विषयावर चांगले मिम्स बनविणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला छानशी रक्कमही भेट म्हणून दिली जाणार आहे. काय आहे स्पर्धा आणि त्यात कसे व्हायचे सहभागी? याबद्धल सर्व काही जाणून घेण्यासाठी खाली माहिती आपणास उपयोगी ठरु शकेल.

निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवर #सशक्त लोकशाही या टॅगखाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आणि मराठी मीम मॉंक्स आयोजित 'मीम स्पर्धा'. बक्षिसाची रक्कम खालील प्रमाणे (हेही वाचा, Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्यास 350 रुपयांचा दंडाचा दावा बोगस, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं स्पष्टीकरण)

  • प्रथम पारितोषिक- 5000 रुपये
  • द्वितीय पारितोषिक- 3000 रुपये
  • तृतीय पारितोषिक- 2000 रुपये
  • प्रत्येक स्पर्धाकस उत्तेजनार्थ- 500 रुपये बक्षीस मिळणार आहे.

स्पर्धेचे विषय

  • मतदार नोंदणी आणि मतदान जागरुकता
  • निवडणुका लोकशाहीचा सोहळा
  • लिंगभेदाच्या पलीकडे नेणारी मतदारांची लोकशाही

स्पर्धेचा कालावधी

  • पहिला टप्पा- 1 ते 15 नोव्हेंबर
  • दुसरा टप्पा- 23 ते 29 नोव्हेंबर

ट्विट

निवडणूक आयोगाने अधिक माहिती देताना म्हटले आहे की, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी 'मीम मॉंक्स' हा फेसबूक ग्रूप जॉइन करा. या गटावरच पोस्ट केलेले मीम्स फक्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now