West Bengal: पश्चिम बंगालमध्ये इफ्तारनंतर 100 हून अधिकजण पडले आजारी, अनेकजण गंभीर

शनिवारपर्यंत ही संख्या वाढून शंभरवर पोहचली.

Iftar (Wikimedia Commons/ Representational Image)

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील मशिदीत रमजानच्या प्रार्थनेनंतर इफ्तार खाल्ल्यानंतर शंभरहून अधिक लोक आजारी पडले. कोलकाता येथील विविध सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. कुलतली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाखीरालय गावात शुक्रवारी ही घटना घडली. (Anji-Khad Bridge: जम्मु काश्मिरमधील अंजी नदीवरील भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल पूर्णत्वाकडे; अभियांत्रिकी चमत्कार आहे 'हा' पूल)

या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने सांगितले की, हे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाले आहे की "काल रात्री, काही आजारी लोक माझ्या नर्सिंग होममध्ये उलट्या आणि पोटदुखीसह आले होते. आम्हाला वाटते की ही घटना इफ्तार पार्टीच्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे घडली आहे.या प्रकरणी नरेंद्रपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, अनेक स्थानिक लोक उपवास संपवण्यासाठी स्थानिक मशिदीत पोहोचले आणि आजारी पडू लागले. शनिवारपर्यंत ही संख्या वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण पहायला मिळाले.

या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून अनेक रहिवासी आजारी पडले आहेत. या रुग्णांवर कोलकाता येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना रमजानच्या पवित्र महिन्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या महत्त्वाची आठवण करून देणारी आहे. उपवास सोडण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमत असताना, दिलेले अन्न वापरासाठी सुरक्षित आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.