Mansukh Mandaviya Writes To Rahul Gandhi: 'COVID-19 नियमांचे पालन करणा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' स्थगित करा', केंद्यीय मंत्र्याचे राहुल गांधी यांना पत्र
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 'COVID-19' नियमांचे पालन करा त्यासाठी आवश्यक गोष्टी सुनिश्चित करा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) स्थगित करा'.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोरोना नियमांची आठवण करुन देत एक पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 'COVID-19' नियमांचे पालन करा त्यासाठी आवश्यक गोष्टी सुनिश्चित करा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) स्थगित करा'. राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपण हा निर्णय घ्यावा, असे केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पक्षात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अधिर रंजन चौथरी यांनी म्हटले आहे की, " भारत जोडो यात्रेला भाजप घाबरला आहे कारण राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होते आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे," असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणूक 2022 च्या प्रचारात भाजपने मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली होती. त्या वेळी कोरोना नियमांची आठवण आली नव्हती काय? असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना लिहीलेला पत्रात राजस्थानमधील भाजपच्या तीन खासदारांनी लिहीलेल्या पत्राचा संदर्भ आहे. या खासदारांनी जगभरात कोविड-19 संसर्गाचा वाढता धोका पाहता भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्याबातब चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Statement: मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचा संदेश पसरवण्याचे काम करतोय, राहुल गांधींची भाजपवर जोरदार टीका)
दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून शेजारी राष्ट्र असलेल्या चीनमध्ये खरोखरच कोविड-रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होताच भारताने गेल्या वर्षभरात बरेच प्रोटोकॉल सुलभ केले, परंतु काही नियम पुन्हा लागू करण्यावर विचार करण्यासाठी गरज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्रालयाची बैठक होणार आहे.
ट्विट
“मास्क आणि सॅनिटायझर्सच्या वापरासह कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, अशी माझी राहुल गांधी यांना विनंती आहे आणि ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे त्यांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी,” असे मंत्र्यांनी 20 डिसेंबरच्या त्यांच्या पत्रात लिहिले आहे.