Manohar Parrikar Death: गोवा मध्ये 18 ते 24 मार्च दरम्यान शासकीय दुखवटा, 18 मार्चला सरकारी कार्यालयं, शाळा, कॉलेज बंद
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी स्वादुपिंडाच्या आजाराने (Pancreatic Cancer ) निधन झाले आहे.
Goa State Mourning Schedule: मनोहर पर्रिकरांच्या (Manohar Parrikar) निधनानंतर केंद्र सरकारने 18 मार्च दिवशी देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता गोवा सरकारने दिलेल्या माहितीनुसार 18 ते 24 मार्च 2019 या सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्याच्या निधनानंतर स्थानिक महानगरपालिका, शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज उद्या (18 मार्च ) एक दिवसासाठी बंद राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी स्वादुपिंडाच्या आजाराने (Pancreatic Cancer ) निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून पर्रीकर स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने गोव्यात राहत्या घरीच त्याच्यावर उपचार सुरु होते.
गोव्यामध्ये सात दिवसांचा शासकीय दुखवटा
मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपासून कलाकार आणि सामान्य गोवेकरांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. उद्या सायंकाळी मिरामार येथे संघ्याकाळी मनोहर पर्रीकर यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.