Gallantryawards: गॅलेंटरी अवॉर्ड वेबसाईटवर वाचा युद्धातील भारतीय योद्ध्यांच्या कहाण्या- पंतप्रधान मोदी
परंतू, आमच्या लष्करातील शूर जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानचे मनसूबे उधळून लावले. अवघे जग या विजयाचे साक्षीदार ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (26 जुलै) आज आपल्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून कारगिल विजयाचे स्मरण केले. कारगिल (Kargil War) युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि हौतात्म्य भारतीय जनता कधीच विसरणार नाही. आजच्या दिवसाच्या निमित्ताने तरुणाईने कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याच्या कहाण्या एकमेकांना सांगायला हव्यात असे अवाहन त्यांनी केले. सोबतच www.gallantryawards.gov.in या संकेतस्थळाला जरुर भेट द्या. या ठिकाणी आपल्याला कारगीरल युद्ध आणि इतर युद्धातील जवानांच्या अनेक कहाण्या, माहिती पाहायला, वाचायला मिळेल, असेही पंतप्रधांनांनी या वेळी सांगितले.
पंतप्रधानांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच सुरुवात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करुन केली. पंतप्रधानांनी सांगितले की, आजच्या दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये भारताच्या विजयाचा झेंडा फडकवला होता. कारगिलमध्ये विजयोत्सव साजरा केला. बलिदान दिले. भारताच्या वीरपुत्रांचा पराक्रम अवघ्या जगाने पाहिले. 26 जुलै हा दिवस मै-जुलै 1999 मध्ये कारगिल युद्धातील भारताच्या विजयाची गौरवशाली गाथा आहे. आमच्या शूर विरांना सलाम, असेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा,Mann Ki Baat on July 26: कोरोना व्हायरस संकटाचा धोका अद्यापही कायम; डॉक्टर, नर्स यांच्याकडून प्रेरणा घ्या- पंतप्रधान मोदी )
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनी सांगितले की, पाकिस्तानने भारताला धोका दिला. परंतू, आमच्या लष्करातील शूर जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानचे मनसूबे उधळून लावले. अवघे जग या विजयाचे साक्षीदार ठरले.