Mann Ki Baat on 27 December Highlights: 2021 मधील नववर्ष संकल्पामध्ये यंदा भारत देशासाठी देखील एक संकल्प करा- नरेंद्र मोदींचं आवाहन
पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये 'आत्मनिर्भर भारत' (Aatmanirbharata) करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27 डिसेंबर) यंदाच्या वर्षातील शेवटचं 'मन की बात' (Mann Ki Baat) द्वारा देशवासियांशी संवाद साधला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये 'आत्मनिर्भर भारत' (Aatmanirbharata) करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. आजच्या 72 व्या एपिसोडसमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. Farmer's Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 डिसेंबरला असणारी 'मन की बात' संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात, शेतकरी संघटनेचे आवाहन.
मन की बात 2020 हायलाईट्स
- आत्मनिर्भर भारत करण्यासाठी स्वदेशी वस्तू निवडा. एकदा बसून दिवसभरात आपण किती परदेशी बनावटाच्या वस्तू घेतो याची यादी करून बघा. शक्य असल्यास त्याच्या स्वदेशी वस्तूंचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.
- बिबट्यांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत.
- देशातील उद्योजकांनी, उत्पादकांनी पुढे यावं असं आवाहन
-श्री गुरु तेग बहादुर जी, माता गुजरी जी, गुरु गोविंदसिंग जी आणि चार साहिबजादास यांच्या बलिदानाला नमन
-कोविड 19 मधील काळात शिक्षण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शिक्षकांनी आजमावलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतींचं कौतुक
- कश्मीरच्या केशरला जगात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार. जीआय टॅग मिळाल्याने निर्यात वाढली आहे. याचा कश्मीर मधील लोकांना फायदा होणार.
-नवं शिकण्याची जिज्ञासा कायम ठेवा. नवं शिकण्याला वयाचं बंधनं लावू नका.
- भारताला सिंगल यूज प्लॅस्टिकपासून मुक्त करायचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना 2021 च्या नववर्षाच्या शुभेच्छा देत प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना रेडिओद्वारा संबोधित करतात. आकाशवाणी वरून त्याचं प्रसारण केले जाते. दरम्यान पुढील मन की बातचा एपिसोड 31 जानेवारी 2021 दिवशी असेल.