Mann Ki Baat Live Streaming: 'मन की बात' पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी साधणार संवाद; कृषी कायदे, संसद अधिवेशन, कोरोना व्हायरस मुद्द्यांवर भाष्य, इथे पाहा थेट भाषण
आज त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा सलग 83 वा भाग असणार आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करतील. आज त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा सलग 83 वा भाग असणार आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अटकळ लावली जात आहे की, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान कृषी कायदे, संसद अधिवेशन, कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन, यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. मन की बात कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Mann Ki Baat Live Streaming) येथे पाहा.
कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ओमीक्रॉन व्हेरीएंट जगभरातील नागरिकांसाठी आणि त्या त्या देशांतील सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांबाबत एक बैठकही केली होती. पंतप्रधान मोदी याच्या मन की बात कार्यक्रम सकाळी 11 वाजता इंडियन रेडिओ, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडियो न्यूज आणि मोबाईलअॅप आदींवर प्रसारित केला जाणार आहे. या कार्याक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांसोबत संवाद करतात. या संवादात विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. (हेही वाचा, 81st Mann Ki Baat: पंतप्रधानांनी मन की बातमध्ये जन धन खात्याबाबत दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या आजच्या संबोधनातील मोदींचे ठळक मुद्दे)
व्हिडिओ
मन की बात कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. या आधी 24 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान अधिक वेगाने कार्यन्वीत करण्यावर जोर दिला होता. पंतप्रधानांनी या वरही प्रकाश टाकला होता की, भारत जगातील पहिल्या देशांपैकी एक आहे. जो ड्रोनच्या माध्यमातून आपल्या गावच्या जमीनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहे.