Mann Ki Baat, February 28, 2021 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' द्वारे साधणार देशवासियांशी संवाद; येथे ऐका Live

आज मोदी मन की बात मध्ये नेमके काय मुद्दे मांडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 28 फेब्रुवारी) 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ प्रोग्रॅमद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी 'मन की बात' मधून देशातील जनतेशी संवाद साधत असतात.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात मोदी भाष्य करतात. तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातील चांगल्या गोष्टी, व्यक्तींची खास कामगिरी जनतेसमोर मांडतात. दरम्यान, आज मोदी मन की बात मध्ये नेमके काय मुद्दे मांडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज मन की बात चा 74 वा एपिसोड आहे. हा एपिसोड तुम्ही आकाशवाणी, दूरदर्शन शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर पेज, भाजपा ट्विटर, फेसबुक पेजवरही ऐकू शकता. नरेंद्र मोदी अॅपवरही याचे प्रसारण करण्यात येईल.

येथे ऐका लाईव्ह:

https://www.facebook.com/BJP4India/

https://www.pscp.tv/BJP4India/1mrGmwgOVevxy?fbclid=IwAR2gTNhbVskiRlmpzRkCzly7hskVu2AC7PbvZT0XAGpyHarMfnKugcYV02M

https://www.bjp.org/

(Mann Ki Baat: लाल किल्ला हिंसा, कोरोना लसीकरण याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली 'मन की बात')

मागील महिन्यात म्हणजेच 31 जानेवारी रोजी वर्षातील पहिल्या मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर खेद व्यक्त केला होता. तसंच भारताचा कोरोना विरुद्धचा लढा, लसीकरण मोहिम जगासाठी एक उदाहरण असल्याचेही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे कोविड-19 संकटात भारताने इतर देशांना केलेल्या मदतीवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, लसीकरण मोहिम, शेतकरी आंदोलन यावर बोलण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif