Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे वयाचे 92 व्या वर्षी निधन
यामुळे भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असे त्यांना मानले जाते.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना आज संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यांनंतर रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. यामुळे भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असे त्यांना मानले जाते.
पाहा पोस्ट -
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यानसिंह कुटुंब भारतात आले. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
त्यांनी सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं.
सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले.