Manish Sisodia Celebrates First Moment After Bail: मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून बाहेर येताच पत्नीसोबत साजरा केला खास क्षण; AAP कार्यकर्त्यांनाही उभारी

त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले. प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असलेल्या सिसोदिया यांनी हा क्षणही साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक छायाचित्र सामायिक करून आपले स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.

Manish Sisodia With Wife | (Photo Credit- X)

आम आदमी पार्टी () नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना जामीन मिळाला. त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले. प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असलेल्या सिसोदिया यांनी हा क्षणही साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक छायाचित्र सामायिक करून आपले स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला. या छायाचित्रात ते आपल्या पत्नीसोबत चाहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. दिल्ली मद्य धोरण (Delhi Liquor Policy) प्रकरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन (Supreme Court Bail) मंजूर केला. दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी हा आनंद पत्नीसोबत चहाचा आस्वाद घेत साजरा केला.

स्वातंत्र्यातील पहिला चहा

मनिष सिसोदिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक खास छायाचित्र सामायिक केले आहे. ज्यामध्ये ते आपल्या पत्नीसोबत चहा घेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक खास कॅप्शनही दिले आहे. ज्यामध्ये ते "स्वातंत्र्याच्या पहाटेचा पहिला चहा…17 महिन्यांनंतर!'', असे सांगत आहेत. याच पोस्टमध्ये त्यांनी ''संविधानाने आपल्या सर्व भारतीयांना जगण्याच्या अधिकाराची हमी म्हणून दिलेले स्वातंत्र्य" असल्याचेही म्हटले आहे. आपल्या सुटकेचे महत्त्व उल्लेखीत करताना त्यांनी प्रियजनांसोबत मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (हेही वाचा, Manish Sisodia Gets Bail: Excise Policy Case मध्ये ED, CBI कडून अटकेत असलेल्या मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यांनंतर जामीन मंजूर)

आप आणि आगामी निवडणुकांवर परिणाम

मनिष सिसोदिया यांना मिळालेला जामीन आम आदमी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा जामीन अतिशय महत्त्वाचा ठरेल. ज्यामुळे हरियाणा आणि दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी कार्यकर्त्यांमद्ये उत्साह वाढेल. पक्षाच्या नेत्यांनी त्यांची सुटका हा एक महत्त्वपूर्ण विजय म्हणून त्यांचे स्वागत केले आहे. AAP नेत्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांना आरोप आणि प्रतिमा हनन करुन बदनाम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न उघडा पडत आहे.

अटक आणि कायदेशीर लढाई

मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन देताना, प्रदीर्घ प्री-ट्रायल कोठडीवर नाराजी व्यक्त केली. तसेच, सिसोदिया यांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही, असेही मत नोंदवले.

एक्स पोस्ट

मनीष सिसोदिया त्यांच्या "स्वातंत्र्याचा पहिला चहा" चा आनंद घेत असताना, त्यांची सुटका हा त्यांचा वैयक्तिक प्रवास आणि आम आदमी पक्षाची राजकीय रणनीती या दोन्हीसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. आगामी निवडणुका तोंडावर आल्या असल्याने, त्यांचे स्वातंत्र्य AAP च्या भविष्यातील मार्गक्रमणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.