Man Stuck In Loo For Entire Flight: मुंबई- बेंगलोर फ्लाईट मध्ये प्रवासी सुमारे 100 मिनिटं अडकला टॉयलेट मध्येच!

मुंबई विमानतळावरून बेंगलोर कडे जाणार्‍या SG-268,या विमानामधील ही घटना आहे.

SpiceJet Flight (Photo Credits: PTI)

मुंबई-बेंगलूरू स्पाईज जेट च्या विमानाच्या टॉयलेट मध्ये एक व्यक्ती सुमारे 100 तास अडकल्याची घटना समोर आली आहे. दरवाज्यामध्ये काही बिघाड झाल्याने ही व्यक्ती आत अडकल्याचा दावा करण्यात आला आहे. Kempegowda International Airport वर हा दरवाजा तोडून आत अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. विमानाच्या लॅन्डिगच्या वेळी या व्यक्तीची अवस्था बिकट झाली होती.

मुंबई विमानतळावरून बेंगलोर कडे जाणार्‍या SG-268,या विमानामधील ही घटना आहे. पहाटे 2 वाजता हे विमान टेक ऑफ झाले होते.हे विमान सोमवारी रात्री 10.55 वाजता उडणं अपेक्षित होतं. मात्र त्याला उशिर झाला होता. अद्याप या प्रवाशाची अधिक माहिती मिळू शकलेली नाही तसेच स्पाईस जेट कडूनही माहिती देण्यात आलेली नाही.

Kempegowda International Airport वरील ग्राऊंड स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, विमान टेक ऑफ़ होताच 14D या सीट वरील व्यक्ती टॉयलेटला गेला मात्र दरवाज्यामध्ये काही बिघाड असल्याने तो आतच अडकून पडला. नक्की वाचा: Flight Delay: प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी 6 मेट्रो विमानतळांवर उभारल्या जाणार 'वॉर रूम'; Jyotiraditya Scindia यांनी जारी केला अॅक्शन प्लॅन .

विमान आकाशात असल्याने क्रु मेंबर्स कडूनही दरवाजा उघडण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे एका एअर हॉस्टेसने दरवाज्याच्या फटी मधून चिठ्ठी पाठवत काही मिनिटांतच लॅन्डिंग होणार असल्याने टॉयलेट सीटचं लीड बंद करून त्यावर बसण्याचा सल्ला देत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

विमान 3.42 ला लॅन्ड झाल्यानंतर इंजिनियर्स विमानात आले. त्यांनी दरवाजा तोडत प्रवाशाची सुटका केली. त्याला तातडीने फर्स्ट एड देण्यात आले. claustrophobia मुळे प्रवासी शॉक मध्ये असल्याची माहिती स्थानिक ऑफिसरने दिली.