Man Rapes Daughter-in-law: वासनांध सासऱ्याचा गर्भवती सुनेवर बलात्कार; निर्दयी नवऱ्याने पीडित पत्नीला काढले घराबाहेर, म्हणाला 'आता ही झाली माझी आई'

वर्षभरापूर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता व त्यानंतर काही महिन्यांनी ती गरोदर राहिली. आरोपी सासऱ्याचा तिच्याविरुद्ध वाईट हेतू असल्याने सून घरी एकटी असल्याची संधी तो शोधत होता.

Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगरमधून (Muzaffarnagar) सासरा आणि सून यांच्या नात्याला काळिमा फासणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने आपल्या गर्भवती सुनेवर बलात्कार (Rape) केला आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेची माहिती पतीला समजल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. वडिलांनी बलात्कार केल्यानंतर ती महिला आता आपली आई झाली आहे, असा दावा त्याने केला. ही घटना समोर आल्यानंतर आता आरोपी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, मीरापूरमधील एका मुलाशी तिचे लग्न झाल्यापासून सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. वर्षभरापूर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता व त्यानंतर काही महिन्यांनी ती गरोदर राहिली. आरोपी सासऱ्याचा तिच्याविरुद्ध वाईट हेतू असल्याने सून घरी एकटी असल्याची संधी तो शोधत होता. एके दिवशी त्याला ती संधी मिळाली व त्याने तिच्यावर बलात्कार केला.

महिलेचा पती 5 जुलै रोजी काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी पीडित युवती आणि तिचे सासरे घरी एकटेच होते. आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत मुलाच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार केला. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या व्यक्तीने महिलेला दिली. पीडितेने सांगितले की, सुरुवातीला घाबरून तिने घडल्या घटनेबाबत कोणाला माहिती दिली नाही. मात्र एके दिवशी तिने तिच्या पतीला हा प्रकार सांगितला.

घटनेची माहिती मिळताच पतीने पत्नीला घर सोडून जाण्यास सांगितले. तो म्हणाला की, आपल्या वडिलांनी बलात्कार केल्यानंतर पिडीत महिला आता त्याची आई झाली आहे. महिलेने घर सोडण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पतीने सांगितले की, ती महिला आता त्याची आई आहे आणि पुढेही राहील कारण तिचे वडिलांशी शारीरिक संबंध होते. (हेही वाचा: Dehradun Murder: विवाहबाह्य संबंधातून नेपाळी महिलेची हत्या, लेफ्टनंट कर्नला अटक)

त्यानंतर महिलेने पोलिसात जाऊन आरोपी आणि त्याच्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी आणि त्याचा मुलगा फरार आहेत. पोलिसांनी सासरा आणि पतीला अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून, जबाबाच्या आधारे कारवाई सुरू करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.