पटना येथे ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला काळे फासून चप्पलांचा मार, एनडीए पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रकार

यानंतर संपूर्ण देशात ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठी आणि विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. यामध्ये एनडीए (NDA) च्या घटक दलातील जनशक्ती पार्टीने पटना (Patna) येथे ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध आंदोलन केले.

ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

पश्चिम बंगाल (West Bengal) येथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या शहामुळे रविवारी (3 फेब्रुवारी) कोलकाता पोलिसांनी सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांना अटक केल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर संपूर्ण देशात ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठी आणि विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. यामध्ये एनडीए (NDA) च्या घटक दलातील जनशक्ती पार्टीने पटना (Patna) येथे ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध आंदोलन केले.

पटना येथे ममता बॅनर्जी यांच्या फोटोला काळे फासून मारहाण करण्याचा प्रकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. दरम्यान रविवारी कोलकाता येथे सीबीआयमधील अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या समर्थनासाठी ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलनासाठी बसल्या. यामुळे सोमवारी लोक जनशक्ती पार्टीच्या महानगर कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.

ममता बॅनर्जी काळे फासून चपलांचा मार (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कार्यकर्त्यांनी प्रथम फोटोवर काळे फासले. तर मधून मधून ममता बॅनर्जी मुर्दाबाद अशा घोषणा करु लागले. तसेच कार्यकर्त्यांचे मन काळे फासून ही भरले नाही तितक्यात एका कार्यकर्त्याने चप्पल काढून फोटोवर मारण्यास सुरुवात केली. तरीही ममता बॅनर्जी यांच्या नावाच्या घोषणा सुरुच ठेवल्या.(हेही वाचा-ममता बनर्जींचं धरणं आंदोलन सुरु; राहुल गांधी, राज ठाकरे यांच्या सह अनेक विरोधकांचा पाठिंबा)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुर्गापूर येथे पंप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दुर्गापूर येथे मोदीजींच्या पोस्टरवरती ममता बॅनर्जी यांचे पोस्टर झळकवण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. मात्र काल पश्चिम बंगाल येथे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राजकीय घटनाक्रमात मोठी खळबळ सुरु झाली आहे. या घटनेत सीबीआय प्रकरणावरुन वाद सुरु झाले आहेत.

तर कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) हे शारदा चीफ फंडाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सीबीआयने दावा केला आहे. परंतु कोणत्याही पुराव्याअभावी सीबीआयच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आज सीबीआयला सुनावले आहे,