IPL Auction 2025 Live

Mallikarjun Kharge: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा सरकारवर निशाणा

पंतप्रधान इथं समुद्रकिनाऱ्याला भेट देत आहेत, फोटो सेशनसाठी जातात, मग आता मंदिरांमध्ये बांधकाम सुरू आहे, म्हणून ते तिथे जातात, फोटो काढतात, पण मणिपूरला जात नाही असे खरगे म्हणाले.

Mallikarjun Kharge (Photo Credit - PTI)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपा सरकारवर मणिपूरमधील परिस्थितीवरुन हल्ला चढवला .ते म्हणाले की त्यांनी जातीय हिंसाचाराचा सामना करणाऱ्या ईशान्येकडील राज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली नाही. येथे पत्रकार परिषद घेणारे खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू होईल ज्यात जातीय हिंसाचार झाला आहे. मणिपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि घडतच आहे. पण पंतप्रधान इथं समुद्रकिनाऱ्याला भेट देत आहेत,  फोटो सेशनसाठी जातात, मग आता मंदिरांमध्ये बांधकाम सुरू आहे, म्हणून ते तिथे जातात, फोटो काढतात, पण मणिपूरला जात नाही असे खरगे म्हणाले. (हेही वाचा - PM Narendra Modi Goes Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या 'उत्साही अनुभवाचे’ फोटो (See Photos))

" पंतप्रधान मोदी केरळला जातात, मुंबईला जातात आणि फोटो काढतात. सगळीकडे जाताना त्यांचे फोटो आम्ही बघतो, हे पाहून कंटाळा आला असेल, पण तुम्ही फोटो क्लिक करण्याची एकही संधी ते सोडत नाही. ते सगळीकडे जातात. पंतप्रधानांचे फोटो सगळीकडे दिसतात. पण ते मणिपूरला का गेले " असा प्रश्न खर्गे यांनी विचारला. तसेच [Poll ID="null" title="undefined"] करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. ते म्हणाले की जेव्हा विरोधी पक्षातील व्यक्तींना लक्ष्य केले जाते तेव्हा त्यांच्यावर विविध खटले लादले जातात. त्या व्यक्ती भाजपमध्ये गेल्यास ते ‘स्वच्छ’ होतात, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला.