पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव देशाच्या सर्वोच्च 'Rule of Nishan Izzuddeen' नागरी पुरस्काराने सन्मानित
या आधी पंतप्रधा मोदी आणि इब्राहिम यांनी माले येथे संयुक्त बैठक घेतली. यात भारतीय प्रतिनिधिमंडळाचाही समावेश होता. या दरम्यान, मालदीवसोबत मित्रवत संबंध पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना मालदीव (Maldives) देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'रूल ऑफ निशान इज्जुद्दीन' (Rule of Nishan Izzuddeen) असे या पुरस्काराचे नाव आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ माझा नव्हे तर, संपूर्ण देशाचा आहे. पंतप्रधान म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मालदीव दौऱ्यावर आहेत. माले येथे पोहोचल्यावर मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद (Foreign Minister Abdulla Shahid) यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. हा दौरा दोन्ही देशांचे संबंध दृढ करणारा आणि तितकाच संस्मरणीय असेल असेही अब्दुल्ला शाहिद यांनी सांगितले.
एएनआय ट्विट
दरम्यान, मालदीव राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद यांनी पंतप्रधान मोदी यांना एका विशेष कार्यक्रमात 'द मोस्ट ऑनरेलबल ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश रुल ऑफ निशान इज्जुद्दीन' ने सन्मानित करण्यात आले. या आधी पंतप्रधा मोदी आणि इब्राहिम यांनी माले येथे संयुक्त बैठक घेतली. यात भारतीय प्रतिनिधिमंडळाचाही समावेश होता. या दरम्यान, मालदीवसोबत मित्रवत संबंध पाहायला मिळाले. (हेही वाचा, इमरान खान यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, भारत पाक संबंध सुधारण्यासाठी चर्चेची मागणी)
एएनआय ट्विट
मोदींनी दिली क्रिकेटची बॅट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलिह यांना टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली क्रिकेटची बॅट भेट दिली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन सांगितले की, सोलिह हे क्रिकेटचे फॅन आहेत. म्हणूनच मी त्यांना वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली बॅट भेट दिली. आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी मालदीवला गेले होते.