MakeMyTrip 'Beaches of India' Campaign: पीएम मोदींच्या भेटीनंतर मेक माय ट्रीपवर लक्षद्वीपबाबतच्या सर्चमध्ये 3400% वाढ; कंपनीने सुरु केली 'बीचेस ऑफ इंडिया' मोहीम
ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रीपने (MakeMyTrip) सोमवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपसाठी प्लॅटफॉर्मवरील सर्चमध्ये 3400% इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीने X वर एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
MakeMyTrip 'Beaches of India' Campaign: नुकतेच पाताप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीचे काही छायाचित्रे त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला दक्षिण आशियातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणले. यानंतर सर्वांचीच या बेटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आता ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रीपने (MakeMyTrip) सोमवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपसाठी प्लॅटफॉर्मवरील सर्चमध्ये 3400% इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीने X वर एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या खासदाराच्या वक्तव्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये, मेक माय ट्रीपचे मुख्य विपणन आणि व्यवसाय अधिकारी राज ऋषी सिंग म्हणतात, 'लक्षद्वीपमध्ये पंतप्रधानांच्या भेटीपासून प्लॅटफॉर्मवर शोधांमध्ये उल्लेखनीय 3400% वाढ झाली आहे. यामुळे आम्हाला 'बीच ऑफ इंडिया' मोहीम सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. या अंतर्गत ग्राहकांना भारतातील समुद्रकिना-यांची माहिती मिळू शकते. आम्ही या अंतर्गत उल्लेखनीय सवलत देखील देत आहोत...' (हेही वाचा: PM Narendra Modi Goes Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या 'उत्साही अनुभवाचे’ फोटो)
#WATCH | On the row over Maldives MP's post on PM Modi's visit to Lakshadweep, Raj Rishi Singh, Chief Marketing and Business Officer, MakeMyTrip says "Lakshadweep has seen a remarkable 3400% increase in on-platform searches ever since PM's visit. This inspired us to build a… pic.twitter.com/xFYSBUsitc
— ANI (@ANI) January 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2024 03:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

