Encounter In Chhattisgarh Sukma District: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवानांची मोठी कारवाई! चकमकीत 10 नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांकडून INSAS, AK 47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

Encounter प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Encounter In Chhattisgarh Sukma District: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील सुकमा जिल्ह्यात (Sukma District) सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांवर (Naxalites) मोठी कारवाई केली आहे. येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Encounter) सुरक्षा जवानांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये डीआरजीसोबत झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून INSAS, AK 47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

नक्षलवाद्यांच्या विरोधात मिळालेल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री विष्णुदेव साई (Vishnu Deo Sai) यांनी सांगितले की, नक्षलवादाविरोधात आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. आम्ही फक्त याच धोरणावर काम करत आहोत. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आता बस्तरमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे युग परत आले आहे. (हेही वाचा - Kulgam Encounter: कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 8 दिवसांत सहावी चकमक)

दरम्यान, मुख्यमंत्री साई यांनी सुरक्षा दलांचे अदम्य धैर्य आणि समर्पणाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा नाश निश्चित असल्याचे म्हटले आहे. या वर्षी सुरक्षा जवानांनी नक्षलवादाच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आणि आतापर्यंत त्यांनी 257 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. (हेही वाचा - Jammu and Kashmir Encounter: बांदीपोरा जिल्ह्यात चकमकीत दहशतवादी ठार; ऑपरेशन सुरू)

यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 257 नक्षलवादी सुरक्षा जवानांनी मारले असून 861 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, 789 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादामुळे लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला असलेला धोका 90 टक्क्यांनी कमी झाला आहे.