Mainpur Clashes: मणिपूरमध्ये Rapid Action Force सोबत जमावाचा पुन्हा संघर्ष, दंगलखोरांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर

दंगलखोरांनी गोदाम जाळले आणि इतर ठिकाणीही जाळपोल केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

मणिपूर रॅपीड अॅक्शन फोर्स (Mainpur Rapid Action Force) आणि दंगलखोर यांच्यात (Mainpur Clashes) पुन्हा एकदा चकमक झाली आहे. दंगलखोरांनी गोदाम जाळले आणि इतर ठिकाणीही जाळपोल केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दंगल इम्फाळ पॅलेस मैदानाजवळ झाली. दंगलखोरांनी एक गोदाम पेटवून दिले. ज्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली. आगीत आदिवासी समाजातील निवृत्त हाय-प्रोफाइल आयएएस अधिकाऱ्याचीही इमारत होती. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत गोदामाची आग आटोक्यात आणली आणि शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखले.

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आर के रंजन सिंग यांच्या इंफाळ शहरातील घराची जमावाने काल रात्री (गुरुवार, 15 जून) तोडफोड केली. बेकाबू झालेल्या दंगलखोरांनी सिंह यांचे घर जाळण्याचाही प्रयत्न केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा शहरात फिरणाऱ्या जमावाची सुरक्षा दलांशी चकमकही झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्विट

इम्फाळमध्ये घडलेल्या घटनेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंग यानी पीटीआय व्हिडिओला सांगितले, “मी 3 मे पासून (जेव्हा राज्यात जातीय संघर्ष सुरू झाला) पासून शांतता प्रस्थापित करण्याचा आणि हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने शांतता समिती स्थापन केली आहे, प्रक्रिया सुरू आहे.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून