Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरीचे बक्षिस अनुक्रमे 10 हजारांचे आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. या लॉटरी सिस्टीममध्ये राज्य शासनाकडून प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता.
आज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
- पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची 12 एप्रिल 1969 स्थापना केली होती. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. त्याशिवाय, लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. त्याशिवाय, लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.
राज्य सरकार संचालीत लॉटरीमुळे आत्तापर्यंत 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत. तर करोडपतींचा आकडाही मोठा आहे. जर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर साठी तुम्ही संपर्क करू शकता. तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

