महाराष्ट्र: आयएनएस तेगमुळे 'क्यार' चक्रिवादळात अडकलेले 17 मच्छिमार थोडक्यात बचावले
क्यार चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण (Kokan) किनारपट्टीला बसला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या 17 माच्छिमार चक्रीवादळातून थोडक्यात बचावले आहे.
'क्यार' चक्रीवादळाने (Kyarr Cyclone) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्यार चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण (Kokan) किनारपट्टीला बसला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या 17 माच्छिमार चक्रीवादळातून थोडक्यात बचावले आहे. इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बोट बुडू लागली होती. त्याठिकाणी उपस्थित असलेली ओएनजीसी बोटीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. शेवटी मच्छिमारांच्या बचावासाठी आयएनएस तेग युद्धनौकाने संबधित धावून आले. तसेच आयएनएस युद्धनौकावर असलेल्या जवानांनी त्यांची सुखरुप सुटका केली.
शुक्रवार रात्रीपासून हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मुंबईवरचे क्यार चक्रीवादळाचे संकट टळले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, कोकणातील नागरिकांना क्यार चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, शनिवारी वैष्णोदेवी नावाची मच्छिमार बोट मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेली होती. त्यावेळी या बोटीमध्ये 17 मच्छिमार होते. ही बोट क्यार चक्रीवादळामध्ये अडकली. बोटीच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बोट बुडायला लागली त्यावेळी 'ओएनजीसी'च्या तेल उत्खनन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तसेच शिपिंग कॉर्पोरेशनच्या बोटीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र क्यार चक्रीवादळामुळे वाचवण्यात यश आले नाही. हे देखील वाचा- Kyarr Cyclone: 'क्यार' चक्रीवादळाचा मुंबई वरील धोका टळला; हवामान विभागाची माहिती
एएनआयचे ट्विट-
दरम्यान, अरबी समुद्रात तैनात असलेली आयएनएस तेग ही युद्धनौका परतत होती. त्यावेळी काही मच्छिमार चक्रीवादळात अडकले असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वेळ न घालवता संबधित ठिकाणी धाव घेवून सर्व मच्छिमारांचे प्राण वाचवले.