Mahadev App Betting Case: तब्बल 144 कोटी रुपये होते Saurabh Chandrakar च्या लग्नाचे बजेट, सेलिब्रेटींची केली दिशाभूल; ED च्या आरोपपत्रात समोर आली धक्कादायक माहिती

परिणामी, त्याने विवाह कार्यक्रमाची सर्व खाती रोखीने सेटल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा जवळचा सहकारी, विकास छापरियावर याची त्याची जबाबदारी सोपवली.

Enforcement Directorate | (File Image)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महादेव अॅप बेटिंग प्रकरणात (Mahadev App Betting Case) शुक्रवारी रायपूर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात 8,887 पानांचे आरोपपत्र दाखल केले. तक्रारीत महादेव अॅप किंगपिन सौरभ चंद्राकरसह 14 आरोपींची नावे आहेत. आरोपपत्रानुसार, चंद्राकरचे (Saurabh Chandrakar) फेब्रुवारी 2023 मध्ये झालेले लग्न हे इव्हेंट आयोजक योगेश पोपट यांचे महादेव अॅपच्या मालकासह दुसरे असाइनमेंट होते.

लग्नाचे एकूण बजेट 144 कोटी रुपये होते. ऑक्टोबर 2022 मध्ये चंद्राकरच्या जवळच्या सहकाऱ्याने पोपट यांच्याशी लग्नाची रचना, नियोजन आणि अंमलबजावणी हाताळण्यासाठी संपर्क साधला होता. डिसेंबर 2022 मध्ये, त्यांनी लग्नाची संकल्पना चंद्राकर यांच्यासमोर मांडली, ज्यांनी कार्यक्रमासाठी थीम निवडली.

पोपट यांच्या विधानानुसार, चंद्राकर यांना 18 टक्के जीएसटीचे पैसे भारत सरकारला द्यायचे नव्हते. परिणामी, त्याने विवाह कार्यक्रमाची सर्व खाती रोखीने सेटल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा जवळचा सहकारी, विकास छापरियावर याची त्याची जबाबदारी सोपवली. आरोपपत्रानुसार, छापरिया हा महादेव अॅपचे हवाला पैसे हाताळतो आणि हवाला फंड भारतीय शेअर बाजारात गुंतव तो तसेच तो किंगपिन चंद्राकरच्या वतीने जमिनीचे व्यवहार करतो.

पोपट यांच्या म्हणण्यानुसार, चंद्राकरच्या सूचनेनुसार त्यांना तीन वेगवेगळ्या प्रसंगी 106 कोटी रुपये रोख मिळाले. त्यांना हवालाद्वारे दुबईत 65 कोटी आणि भारतात 42 कोटी मिळाले. सर्व देयके विकास छापरिया उर्फ चिकूने व्यवस्थापित केली होती. पोपट यांच्या विधानानुसार, 18 सप्टेंबर 2023 रोजी दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये चंद्राकरने आणखी एका भव्य डिनर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहणार होते. परंतु पुढे तो रद्द करण्यात आला. त्यावेळी चंद्राकरला श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

आरोपपत्रानुसार हे देखील उघड झाले आहे की, अनेक सेलिब्रिटींनी सप्टेंबर 2022 मध्ये महादेव अॅप सक्सेस पार्टीमध्ये परफॉर्म करण्यास किंवा हजर होण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर चंद्राकर आणि त्यांच्या साथीदारांनी सेलिब्रिटींची दिशाभूल करून त्यांना महादेव अॅप सक्सेस पार्टीमध्ये बोलावले.

ईडीला दिलेल्या निवेदनात, व्यावसायिक कार्यक्रम आणि कलाकार समन्वय साधणारे अभिजित चौधरी यांनी सांगितले की, ते 18 सप्टेंबर 2022 रोजी दुबईमध्ये आयोजित महादेव अॅप सक्सेस पार्टीचे समन्वयक होते. महादेव अॅप सक्सेस पार्टी इव्हेंटसाठी सेलिब्रिटीजची नियुक्ती करण्यासाठी दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, सेलिब्रिटींनी महादेव अॅप पार्टीत हजर राहण्यास किंवा परफॉर्म करण्यास नकार दिला. (हेही वाचा: Mumbai Shocker: वांद्रे येथील हाय-प्रोफाइल त्वचारोगतज्ज्ञ Dr Ruby Tandon हिला अटक; बनावट पदवीच्या आधारे करत होती उपचार)

त्यानंतर देवांग शाह आणि करण रमाणी नावाच्या दोन व्यक्तींनी चौधरी यांना महादेव अॅपऐवजी दुबईस्थित मुस्कान मॅनेजमेंट कंपनीसाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सांगितले. पुढे मुस्कान इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली सेलिब्रेटींशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना सप्टेंबर 2022 च्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी 10 लाख आगाऊ देण्यात आले, उर्वरित पेमेंट रोख स्वरूपात झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif