Madrasa Students Killed Imam: मदरशात इमामद्वारे विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ; मुलांनी गळा दाबून केली हत्या, 6 जणांना अटक

या मुलाला पैशाचे आमिष दाखवून गप्प केले गेले. यानंतरही इमामने मुलावर लैंगिक अत्याचार करणे सुरूच ठेवले.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Madrasa Students Killed Imam: राजस्थानमधील अजमेरमध्ये (Ajmer) एका मौलानाची किंवा इमामची (Maulana) हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदरशातील (Madrassa) 6 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या 32 वर्षीय इमामाचे नाव मौलाना माहिर होते. अहवालानुसार इमामद्वारे या मुलांवर लैंगिक अत्याचार होत होते. या छळाला कंटाळून 27 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील रामगंज पोलीस स्टेशन हद्दीतील दौराई गावातील मोहल्ला कांचन नगर येथील मोहम्मदी मशिदीत ही घटना घडली.

तपासादरम्यान पोलिसांना मौलाना माहिरचा मोबाईल सापडला आणि ज्या दोरीने त्याचा गळा दाबला गेला होता तीही जप्त केली गेली. अहवालानुसार मदरशातील एका विद्यार्थ्याचा माहिरने लैंगिक छळ केल्याचे सांगितले जात आहे. या मुलाला पैशाचे आमिष दाखवून गप्प केले गेले. यानंतरही इमामने मुलावर लैंगिक अत्याचार करणे सुरूच ठेवले. अशा स्थितीत इतर विद्यार्थ्यांनी एक योजना बनवून एके दिवशी माहिरला बेशुद्ध केले, नंतर काठ्यांनी मारहाण करून दोरीने त्याचा गळा दाबून खून केला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जवळ जवळ 15 दिवस पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत होते. विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, अज्ञात लोकांनी माहिरची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले पण काहीही सापडले नाही. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली. सर्वांकडे वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी सर्व काही कथन केले. इमामने विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याची माहितीही यातून समोर आली. (हेही वाचा: CBSE Student Dies by Suicide: बारावीच्या परिक्षेत दोन विषयात नापास झाल्याने 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, चौकशी सुरु)

पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, हत्येच्या घटनेच्या दोनच दिवस आधी माहिर गावावरून परतला होता. 26 एप्रिल रोजी तो जेवायला गेला असता विद्यार्थ्यांनी त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मौलाना झोपायला गेल्यावर विद्यार्थ्यांनी स्टोअर रूममधून काठ्या आणि दोरी आणली. माहिर झोपताच त्यांनी त्याच्या डोक्यावर काठीने वार केले व दोरीने त्याचा गळा दाबण्यात आला. त्यानंतर सगळे तिथून पळून गेले. मशिदीचे तौसिफ अश्रफ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. आता तपासाअंती पोलिसांनी 6 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif