Madhya Pradesh Shocker: देवासमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून केली हत्या, तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला; आरोपीला अटक

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. शेजाऱ्यांची चौकशी केली. ही महिला संजय पाटीदारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले. पिंकी उर्फ प्रतिभा असे तिचे नाव आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी संजयला उज्जैन येथून अटक केली.

Decomposed Body of woman found in a fridge in Madhya Pradesh's Dewas. (Photo Credits: X/@ians_india)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) देवास (Dewas) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका पुरुषाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची (Live-In Partner) गळा आवळून हत्या केली व त्यांतर मृतदेह जवळजवळ 11 महिने फ्रीजमध्ये लपवून ठेवला. इतके महिने मृतदेह तसाच फ्रीजमध्ये पडून राहिला, मात्र दुर्गंधी पसरू लागल्यावर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांन याची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देवास पोलिसांना वृंदावन धाम कॉलनीतील एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी घराची चौकशी केली असता त्यांना फ्रीजमधून दुर्गंधी येत असल्याचा संशय आला. त्यानंतर फ्रीजमध्ये एक मृतदेह पडलेला दिसला. बीएनपी पोलीस स्टेशनचे प्रभारी अमित सोलंकी यांनी सांगितले की, मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै 2023 मध्ये हे घर संजय पाटीदारला भाड्याने दिले होते. संजयने जून 2024 मध्ये घर सोडले, परंतु त्याचे काही सामान एका खोलीत ठेवले. त्यात फ्रीजही होता.  घटनास्थळी पोहोचलेल्या एफएसएल अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेचा मृतदेह गेले अनेक महिने तासच पडून होता.

उज्जैन येथून आरोपीला अटक-

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. शेजाऱ्यांची चौकशी केली. ही महिला संजय पाटीदारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले.  पिंकी उर्फ ​​प्रतिभा असे तिचे नाव आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी संजयला उज्जैन येथून अटक केली आहे. (हेही वाचा: Meerut Murder Case: मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पोलिसांकडून कसून चौकशी)

किरकोळ वादातून 10 महिन्यांपूर्वी हत्या-

आरोपी संजयने सांगितले की, तो पिंकी उर्फ ​​प्रतिभा प्रजापतीसोबत पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. लग्नाच्या दबावामुळे झालेल्या वादातुने त्याने वर्षी मार्चमध्ये पिंकीची गळा आवळून हत्या केली. त्याचा एक साथीदार विनोद दवे याचाही या हत्येत सहभाग आहे. पोलीस आल्यावर फ्रिजमध्ये मृतदेह पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. मृतदेह पूर्ण काळवंडला होता.

खोलीला कुलूप लावून संजय गेल्याचे घरमालकाने सांगितले. तो भाडेही भरत नव्हता. वारंवार विचारणा केली असता तो अनेक कारणे द्यायचा. आता ही हत्या धक्कादायक असल्याचे पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोद यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपी संजय पाटीदार हा उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने त्याचा साथीदार विनोद दवे याच्या मदतीने हा संपूर्ण खून केल्याचे उघड झाले आहे. विनोद दवे राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील तुरुंगात काही गुन्ह्यात बंद आहे. त्याबाबत राजस्थान पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now