Madhya Pradesh Shocker: बेकायदा बालगृहातील 26 मुली बेपत्ता, मध्य प्रदेश येथील धक्कादायक घटना
एफआयआरनुसार, बालगृहात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, जे बेकायदेशीरपणे चालवले जात होते.
गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह (Gujarat, Jharkhand, Rajasthan and Madhya Pradesh) विविध राज्यांतील किमान 26 मुली भोपाळमधील बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या निवारागृहातून बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी भोपाळच्या बाहेरील परवालिया भागातील आंचल मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी रजिस्टर तपासले असता त्यात 68 मुलींच्या नोंदी होत्या मात्र त्यातील 26 गायब असल्याचे त्यांना आढळले. बेपत्ता मुलींबाबत शेल्टर होमचे संचालक अनिल मॅथ्यू यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. (हेही वाचा - Viral Video: सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणीची वृध्दाकडून छळ, आरोपीला दिला चोप)
पाहा पोस्ट -
या मुली गुजरात, झारखंड आणि राजस्थानमधील होत्या, तर काही मध्य प्रदेशातील सीहोर, रायसेन, छिंदवाडा आणि बालाघाट येथील होत्या. एफआयआरनुसार, बालगृहात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, जे बेकायदेशीरपणे चालवले जात होते.
एका ट्विटमध्ये, कानुंगो म्हणाले की, बालगृहाचे व्यवस्थापन करणार्या एका मिशनरीने काही मुलांना रस्त्यावरून सोडवले होते आणि ते कोणत्याही परवान्याशिवाय निवारागृह चालवत होते. सुटका करण्यात आलेल्यांना बालगृहात गुपचूप ठेवण्यात आले होते आणि त्यांना ख्रिश्चन धर्माचे पालन करायला लावले होते, असा आरोप त्यांनी केला.