Madhya Pradesh: इंदौर मध्ये नागरिकांच्या आयुष्याशी खेळ, सार्वजनिक टॉयलेटमध्ये ठेवली जात होती अंडी आणि खाद्य पदार्थ
हा व्यक्ती व्यावसायिक उद्देशाने खाद्य पदार्थ आणि अंड्यांची साठवणूक करत होता.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील इंदौर मध्ये शौचालयांचे देखभाल करणाऱ्या एका व्यक्तीने सार्वजनिक शौचालयात अंडी आणि खाद्य पदार्थ स्टोअर करुन ठेवल्याची बाब समोर आली आहे. हा व्यक्ती व्यावसायिक उद्देशाने खाद्य पदार्थ आणि अंड्यांची साठवणूक करत होता. इंदौर नगर निगमच्या अॅडिशन कमिश्नर यांनी असे म्हटले की, व्यक्तीकडे सार्वजनिक शौचालयात अंडी आणि मांस कापण्याच्या वस्तूंची साठवणूक करत असल्याचे आढळून आले. व्यक्तीला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून शौचालयाचे संचलन करणाऱ्या व्यक्तीवर 20 हजारांचा दंड लावला आहे.(Odisha: अंधश्रद्धेचा कळस! ओडिशामध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कुत्रीशी लावले दोन मुलांचे लग्न; समोर आले धक्कादायक कारण)
मीडिया रिपोर्ट्स नुसार, लोहा मंडी क्षेत्रात सुलभ शौचालयाच्या निरीक्षणादरम्यान असे दिसून आले की, यामध्ये अंडी आणि मांसचे व्यवसाय चालवला जात आहे. यानंतर अधिकाऱ्याने शौचालयाच्या केअरटेकरला फटकारले आणि तेथे अवैध कारभारावर 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला.(Vehicle Scrappage Policy: एक एप्रिलपासून भंगार व्यवसायाला 'अच्छे दिन'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय ठरणार महत्त्वपूर्ण)
Tweet:
अवैध कारभार आणि लोकांच्या आरोग्यासोबत खेळ करणाऱ्या शौचालयाच्या संचालन करणाऱ्या व्यक्तीवर 20 हजारांचा दंड लावला जाणार आहे. शौचालय सारख्या जागेवर खाद्य पदार्थांची साठवणूक फक्त अनधिकृत पद्धतीने नव्हे तर नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दुसऱ्या बाजूला देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लू शी झुंज देत असून जीवघेणा ठरु शकतो.