Madhya Pradesh Sex Scandal: सरकारी अधिकाऱ्यांचे न्यूड व्हिडिओ, फोटो, सेक्स चॅट संबंधित तब्बल 4000 पेक्षाहीअधिक फाईल्स

मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात पाच महिलांसह सुमारे 6 जणांना अटक केली आहे.

Honey Trap Case | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: (File Photo)

Madhya Pradesh honeyTrap case: मध्य प्रदेश राज्यातून हनीट्रॅप (HoneyTrap) प्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार हे हनीट्रॅप प्रकरण म्हणजे एक ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅंडल (Blackmailing Sex Scandal) आहे. पोलीस कारवाईत आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधत जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून तब्बल 4,000 फाईल्स मिळाल्या आहेत. या फाईल्समध्ये अनेक राजकीय नेते, सरकारी अधिकारी आि व्यापाऱ्यांचे सेक्स चॅट स्क्रिनशॉट, आक्षेपार्ह स्थितीत असलेले नग्न व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिप्स आणि फोटोही आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात पाच महिलांसह सुमारे 6 जणांना अटक केली आहे. या सहाही जणांना इंदौर आणि भोपाळ येथून अटक करण्यात आली आहे.

चौकशी यंत्रणांना हनीट्रॅपशी संबंधीत लोकांच्या लॅपटॉप आणि स्मार्टफोनमधून हे व्हिडिओ, स्क्रिनशॉट तसेच ऑडिओ क्लिप्स आणि फोटो मिळाले आहेत. तपास यंत्रणेशी संबंधीत एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले आहे की, हे हनी ट्रॅप प्रकरण देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. या प्रकरणाच्या तपासात अधिकाधिक क्लिप्स आणि फाईल्स हाती लागत आहेत,असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क या सर्व गोष्टींची न्यायवैध्यकीय चाचणी (फॉरेन्सीक टेस्ट) केली जात आहे. मेमरी कार्डमधून व्हिडिओ काढणे आणि त्याची वैधतात तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या तपासात 4 हजारपेक्षाही अधिक फाईल्स मिळाल्या आहेत. ही संख्या 5 हजारांपर्यंतही पोहोचू शकते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या सेक्स स्कँडल प्रकरणात सापडलेल्या मुलींचे वय साधारण 18 वर्षे इतके आहे. या मुली भोपाळमधील एका प्रसिद्ध क्लबमध्ये जात असत. इथे वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित असत, हे अधिकारी या मुलींकडून वाईट कामे करवून घेत असत. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, क्लबचे चेकइन रजिस्टरही गायब झाले आहे. बोलले जात आहे की, या रेकॉर्डमध्ये मुलीचे फोटे आहेत या फोटोंसोबत छेडछाड केल्याचे समजते. (हेही वाचा, पुणे: शिरुर येथील Whatsapp Group वर पाकिस्तान येथून Honey Trap झाल्याचा संशय , तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न)

हनीट्रॅप प्रकरणात अनेक प्रतिष्ठीत मंडळींची नावे आहेत. ही यादी बरीच लांब आहे. यात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपासून ते ज्युनिअर प्रकल्प अभियंते तसेच, भाजप, काँग्रेस आदी पक्षांचे अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील व्हिडिओ जसजसे पुढे येत आहेत तसतसे आपल्या प्रतिमेचे काय होणार ही भीती या अधिकाऱ्यांना सतावते आहे. या प्रकरणावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.