मध्य प्रदेश: नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला मगरीने जिवंत गिळले, परिसरात भीतीचे वातावरण

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला नदीतील मगरीने जिवंत गिळले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crocodile (Photo Credits: Unsplash/Representational Image)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला नदीतील मगरीने  जिवंत गिळले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नरेंद्र तोमर (18) असे मृत मुलाचे नाव आहे. नरेंद्र हा चंबल नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी गावातील नागरिकांनी त्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र हे गावकऱ्यांचे प्रयत्न फोल ठरले. अखेर मगरीने नरेंद्र याला गिळले. (गरब्यामध्ये मगरीची उपस्थिती; लोकांची बोबडी वळली)

परंतु नरेंद्र याला नदीत मगरींचे वास्तव असल्याचे माहिती होते. तरीही त्याने नदीत पोहण्याचे धाडस करत आपला जीव गमावला आहे. तसेच नदीत 500 पेक्षा अधिक मगरी असल्याचे तेथील पाणबुड्यांनी गावकऱ्यांना सांगितले.