महागाईच्या दिवसात चोरट्यांकडून मध्य प्रदेशात 25 लाख तर सुरत येथून 250 किलो कांद्यावर डल्ला

याच परिस्थितीत काही राज्यामधून कांद्याची चोरी केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी मध्ये चोरांनी एका ट्रक मधून जवळजवळ 25 लाख रुपयांचा कांदा चोरला आहे.

Onions (Photo Credits: IANS)

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. याच परिस्थितीत काही राज्यामधून कांद्याची चोरी केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी मध्ये चोरांनी एका ट्रक मधून जवळजवळ 25 लाख रुपयांचा कांदा चोरला आहे. तर पश्चिम बंगाल येथून 100 किलो आणि सुरत मधून 250 किलोचा कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देत सांगितले की, नाशिकचे व्यापारी प्रेमचंद शुक्ला यांनी गोरखपुर येथे 25 लाख रुपयांचा कांदा पाठवला होता. त्याच दरम्यान चोरट्यांनी ट्रक पळवून त्यामधील कांदा गायब होता.

तसेच गुजरात मधील पालनपुर पाटिया मार्केट येथे जवळजवळ 250 किलो कांद्याची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी असे सांगितले जात आहे की, 5 पोत्यांमध्ये कांदा ठेवण्यात आला असून प्रत्येक पोत्यात 50 किलोचा कांदा होता. कांदा चोरी झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या कांद्याचे दर 150 रुपये किलोंवर पोहचल्याने सामान्यांचा शिखाला कात्री बसली आहे.(कांद्याचे दर 150 रुपयांवर पोहचणार, सामान्यांच्या शिखाला बसणार कात्री)

या आधी टोमॅटोचे आणि आता कांद्याचे दर वाढल्याने देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही जागांवर कांद्याचे दर 100 रुपये प्रति किलो दर झाले आहे. राजधानी दिल्लीत 80 रुपयांनी विकले जात आहेत. तर 6090 टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला आहे. मात्र कांदा भारतात येण्यासाठी अजून 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कांद्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी  अक्षय दास नावाच्या एका व्यापाऱ्याने असे म्हटले आहे की, लसूण, कांदा आणि आल यांची 50 हजार रुपये किंमत असून काही अज्ञातांनी त्याची चोरी केली आहे. तसेच लसूण आणि आल यांची किंमत जवळजवळ 12 हजार रुपये होती. चोरी झालेले दुकान पूर्व मिदनापुर मधील सूतहाट पोलीस स्थानकाअंतर्गत येते. तर चोरी झाल्याने व्यापाऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. या प्रकारावर दास यांनी पैशांऐवजी कांद्याची चोरी झाल्याची बाब धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.