IPL Auction 2025 Live

Madha Lok Sabha Election 2024: धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर, कोण जिंकणार माढ्याचं मैदान?

या मतदारसंघात मोठ्या दिग्गज राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Photo Credit- Facebook

Madha Lok Sabha  Election 2024: माढा लोकसभा मतदारसंघाकडे (Madha Lok Sabha Election Result 2024) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात मोठ्या दिग्गज राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणजितसिंह निंबाळकर (RanjeetSingh Nimbalkar) यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सभा घेतल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite patil) यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. 2019 च्या निवडणुकीला रणजितसिंह निंबाळकर यांनी निवडणूक लढवत संजयमामा शिंदे यांना पराभूत केले होते. (Solapur Lok Sabha Election 2024: प्रणिती शिंदे की राम सातपुते? सोलापूरमध्ये दोन्ही तरुण आमदार आमनेसामने )

रणजितसिंह निंबाळकर-

2019 साली माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवी होती. यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचा 85764 मतांनी विजय झाला होता.

माढा लोकसभेत 11 लाख 92 हजार 190 म्हणजे जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. यात सर्वात जास्त मतदान हे फलटण येथे 64 टक्के तर सर्वात कमी मतदान करमाळा येथे 55 टक्के झालं आहे. माढा तालुका 61 टक्के, माळशिरस 60 टक्के, माण 58 टक्के मतदान झाले. सांगोला तालुक्यात देखील 60 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

माढा - बबनदादा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट

करमाळा - संजयमामा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट

सांगोला - शहाजीबापू पाटील - शिवसेना शिंदे गट

माळशिरस - राम सातपुते - भाजप

माण खटाव - जयकुमार गोरे - भाजप

फलटण - दिपक चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट