Lulu Mall Sexual Harassment Case: लुलू मॉल लैंगिक छळ प्रकरणातील निवृत्त मुख्याध्यापकाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
बंगळुरू येथील लुलु मॉलमध्ये महिलांचा लैंगिक छळ (Lulu Mall Sexual Harassment Case) केल्याचा आरोप असलेल्या अश्वथ नारायण (वय 61) नावाच्या शाळेतील निवृत्त शिक्षकाने आत्मसमर्पण केले आहे.
बंगळुरू येथील लुलु मॉलमध्ये महिलांचा लैंगिक छळ (Lulu Mall Sexual Harassment Case) केल्याचा आरोप असलेल्या अश्वथ नारायण (वय 61) नावाच्या शाळेतील निवृत्त शिक्षकाने आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक न्यायालयात त्याने 2 नोव्हेंबर रोजी हजेरी लावली आणि संध्याकाळी 5 वाजता आत्मसमर्पण केले. तिसऱ्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) न्यायालयासमोर तो हजर झाला. बसवेश्वरा नगर येथे राहणारा नारायण याने यापूर्वी दसराहल्ली येथील श्री वीरभद्र हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. नंतर तो सेवानिवृत्त झाला.
सोशल मीडियावर 29 ऑक्टोबरपासून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नारायण हा महिलांना अयोग्यरित्या स्पर्श करत असल्याचे आढळून आले होते. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याला लुलू मॉलमधील व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याने त्याचे व्हिडिओ चित्रिकरण केले. ज्यात तो महिलांना अयोग्यरित्या स्पर्ष करत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बेंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आणि मगडी पोलिस ठाण्यात एफआयआर देखील नोंदवला.
लुलू मॉलमध्ये 29 ऑक्टोबर रोजी लोक त्यांची साप्ताहीक सुट्टी आनंदाने साजरे करत होते. तेव्हा गर्दीचा फायदा गेऊन हा व्यक्ती त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करत होता. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, लैंगिक छळाची ही घटना 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बेंगळुरूमधील लुलू मॉलच्या गेम झोनमध्ये घडली. व्हिडीओमध्ये एक माणूस गर्दीच्या ठिकाणी मागून एका तरुणीला मुद्दाम स्पर्श करत असल्याचे दिसत आहे.
एक्स पोस्ट
यशवंत जयप्रकाश, जो मॉलमध्ये एक सामान्य व्यक्ति म्हणून आला होता आणि त्याने आरोपीच्या वर्तनाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याने मीडियाला माहिती दिली की, सुरुवातीला नारायण याचा स्पर्श चुकून झाला असावा. पण नंतर तो महिलांना वारंवार असभ्यरित्या स्पर्ष करत होता. पुढच्या 10-15 मिनिटांत, त्याने नारायण याला जाणूनबुजून महिलांच्या एका गटाकडे जात असल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत शेअर केला.