लखनौ कोर्टाच्या परिसरात क्रुड बॉम्बचा हल्ला, पोलिसांकडून तपास सुरु
बॉम्ब हल्ला करण्यात आल्याने यामध्ये दोन वकिल जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथील कोर्टाच्या परिसरात गुरुवारी क्रुड बॉम्ब हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बॉम्ब हल्ला करण्यात आल्याने यामध्ये दोन वकिल जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत घटनास्थळावरुन तीन जिवंत बॉम्ब हस्तगत केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. पण क्रुड बॉम्ब का आणि कोणी फेकला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी लखनौ जिल्हा कोर्टात क्रुड बॉम्ब फेकण्यात आला. यामध्ये दोन वकिल जखमी झाले आहेत.
कोर्टाच्या परिसरात करण्यात आलेला हल्ला वकिल संजीव लोधी यांच्या चेंबरला निशाण्यावर ठेवून केला होता. लोधी यांनी या हल्ल्यामागे दुसरे वकिल जीतू यादव असल्याचा आरोप लावला आहे. या दरम्यान दोन राउंड फायरिंग सुद्धा करण्यात आली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हल्ला असोसिएशनचे संयुक्त मंत्री संजीव लोधी यांच्यावर निशाणा साधून करण्यात आला.(सर्वोच्च न्यायलयाचा राजकीय पक्षांना दणका; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर करण्याचे आदेश)
ANI Tweet:
वकिलांमध्ये या हल्ल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनास्थळी दाखल झालेले पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वकिलांच्या दोन गटातील वादामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली होती.