LPG Cylinder Prices: कोविड 19 संकट काळात सलग 6 महिने कुकिंग गॅस सिलेंडर किंमती स्थिर; पहा कमर्शिअल गॅस सिलेंडरचे नवे दर
स्वयंपाक घरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कोविड 19 संकट काळात सलग सहा महिने ऑईल मार्केटिंग कंपनीकडून स्थिर ठेवण्यात आले आहेत
स्वयंपाक घरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कोविड 19 संकट काळात सलग सहा महिने ऑईल मार्केटिंग कंपनीकडून स्थिर ठेवण्यात आले आहेत. IOL website नुसार, Indane च्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती 14.2 kg cylinder साठी स्थिर आहे. या गॅस सिलेंडरच्या मुंबईतील किंमती 594 रूपये, दिल्लीमध्ये 594 रूपये, कोलकत्तामध्ये 620 रूपये तर चैन्नईमध्ये 610 रूपये ठेवण्यात आला आहे.
कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर आकरण्यात येणार आहेत. 19 kg commercial LPG गॅस सिलेंडरसाठी मुंबईमध्ये 1244 रूपये, दिल्ली मध्ये 1296 रूपये, कोलकत्ता मध्ये 1351.50 रूपये तर चैन्नईमध्ये 1410.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान दर महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तपासले जातात. जागतिक घडमोडी, क्रुड तेलाच्या किंमती अशा विविध घटनांचा गॅस सिलेंडरच्या किंमतींवर परिणाम होत असतो. यंदा कोविड 19 संकटकाळात विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ झालेली नाही. दरम्यान कुकिंग गॅसच्या किंमती या सर्वत्र वेगवेगळ्या आहेत. स्थानिक करांचा त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे देशात विविध राज्यांमध्ये विविध किंमती असतात.