Coronavirus: बेचव आणि वास न येणे ही देखील COVID-19 ची लक्षणे, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

तोंडाची चव जाणे आणि वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे देखील कोरोनाची लक्षणे असल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत जाणे यास मुख्य कारण अनेकदा या विषाणूचे निदान लवकर न होणे हे आहे. लोकांना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो वायरल आहे असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता यात बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तोंडाची चव जाणे आणि वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे देखील कोरोनाची लक्षणे असल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. How to Wear Mask: वैद्यकिय मास्क घालताना काय काळजी घ्याल?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी 3 लाखाच्या वर गेला असला तरी सद्य घडीला ऍक्टिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांच्या आकड्यानुसार कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे ही काहीशी दिलासादायक बाब म्हणता येईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now