IPL Auction 2025 Live

Loksabha Election 2024: गुजरातमध्ये एकाच दिवसात भाजपाच्या दोन उमेदवारांची निवडणुकीतून माघार

त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत, ''मी रंजनबेन धनंजय भट्ट. काही खासगी कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही.'' असं म्हटलं.

BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Loksabha Election) भाजपला मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवसामध्ये दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी गुजरातच्या वडोदरा मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप उमेदवार रंजन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता गुजरातच्या साबरकांठा येथून भाजप उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. (हेही वाचा - Six Disqualified Congress MLAs Join BJP: हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या 6 अपात्र आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश)

पाहा पोस्ट -

वडोदरा येथून रंजनबेन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं. त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत, ''मी रंजनबेन धनंजय भट्ट. काही खासगी कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही.'' असं म्हटलं. त्यानंतर काहीच वेळात साबरकांठा येथील भाजप उमेदवार भीकाजी ठाकोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. ''मी भीकाजी ठाकोर. काही खासगी कारणांमुळे मी साबरकांठा येथून लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही'' अशी पोस्ट ठाकोर यांनी इन्स्टाग्रामवर केली.

पाहा पोस्ट -

भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी भट्ट यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. वडोदरा येथून तिसऱ्यांदा भट्ट यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप महिला सेलच्या उपाध्यक्ष ज्योतीबेन पंड्या यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये वडोदराची जागा सोडल्यानंतर भट्ट यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भट्ट विजयी झाले होते आणि आगामी निवडणुकीसाठी त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती.