Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी सट्टाबाजाराचा अंदाज, भाजपाला 250 तर एनडी पक्षाला 300 जागा मिळणार असा अंदाज

तसेच पक्षाकडून उमेदवार यादी सुद्धा जाहीर करण्यात येते आहे.

Lok Sabha Elections (Photo Credit: File Photo)

Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तसेच पक्षाकडून उमेदवार यादी सुद्धा जाहीर करण्यात येते आहे. तत्पूर्वी यंदाच्या वर्षी सत्ता कोणाची येणार यावर सट्टा खेळण्याची सुरुवात झाली आहे. तर सट्टाबाजाराने आगामी सरकार कोणाचे येणार याबद्दल अंदाज दर्शवला आहे.

देशभरात प्रसिद्ध असणारा राजस्थान येथील फालोडीच्या सट्टाबाजाराने आगामी सरकार कोण स्थापन करणार याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रात पुढील सरकार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे असेल असे म्हटले आहे. तर भाजप पक्षाला 250 पेक्षा जास्त आणि एनडीएला 300 अशा जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला पूर्वीपेक्षा कमी जागेवर विजय स्विकारावा लागेल.(हेही वाचा-पुरी मतदार संघातून नरेंद्र मोदी नाही तर 'या' नेत्याला भाजप रिंगणात उतरवणार)

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर वायुसेने पाकिस्तानच्या बालकोटवर हल्ला केल्याने मतदारांना मोदी हे अधिक वर्चस्व मिळवू शकतात. तर राजस्थानमध्ये 25 पैकी 18 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार असल्याचे ही सट्टा बाजाराने म्हटले आहे.