मथुरा: रेल्वेमधील दारू पार्टीने त्रस्त झाले लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, 5 तळीरामांना दाखवला जेलचा रस्ता
न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून इंदोरला जाणा-या इंदोर इंटरसिटी एक्सप्रेसमधील (Indore Intercity Express) फर्स्ट क्लास एसी कोचमधून ओम बिरला (Om Birla) प्रवास करत होते.
रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये दारू पार्टी करणा-या तळीरामांमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी रेल्वेत उच्छाद मांडलेल्या या 5 तळीरामांची तुरुंगामध्ये रवानगी केली आहे. न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून इंदोरला जाणा-या इंदोर इंटरसिटी एक्सप्रेसमधील (Indore Intercity Express) फर्स्ट क्लास एसी कोचमधून ओम बिरला (Om Birla) प्रवास करत होते. त्यावेळी तेथे दारू पार्टी करणा-या 5 तळीरामांना ओम बिरला यांनी जेलचा रस्ता दाखवला आहे.
ओम बिरला नवी दिल्ली ते इंदोर असा इंटरसिटीमधून प्रवास करत असताना त्यांच्या पुढच्या कोचमधील काही तरुण रेल्वे सुरु होतात दारू पिऊन धिंगाणा करु लागले. त्यांच्या त्या हुल्लडबाजीचा ओम बिरला यांना प्रचंड त्रास झाला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना पाचारण करुन त्या 5 तळीरामांची जेलमध्ये रवानगी केली. हेही वाचा- तळीराम चकणा खाण्यात मग्न, रेल्वेने तिघांना चिरडले
इतकच नव्हे तर त्यांचा तो धिंगाणा आवरण्यासाठी ओम बिरला यांचे पीए राघवेंद्र तिथे गेले असता त्या तळीरामांनी त्यांच्यासोबत हुज्जत घातली. हा सर्व प्रकार पाहून ओम बिरला यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता जेव्हा ही एक्सप्रेस मथुरा जंक्शन ला पोहोचली तेव्हा आरपीएफ आणि जीआरपी जवानांनी त्या तळीरामांना बेड्या ठोकून त्यांची जेलमध्ये रवानगी केली.
या तळीरामांवर रेल्वेमध्ये मद्यपान करणे आणि हुल्लडबाजी करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.