Lok Sabha Election Results 2019: NDA ची विजयाकडे कूच; शेअर बाजार उसळला, सेन्सेक्स पहिल्यांदा 40,000 च्या पार
आज (23 मे) शेअर बाजार 600 अंकांनी अधिकने उघडला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये आजही उत्साह कायम आहे.
लोकसभा निवडणूक निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सध्या सुरूवातीच्या कलनुसार एनडीए (NDA) आघाडीवर आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर दिसत आहे. सुरूवातीचे कल पाहता शेअर बाजारात उत्सहाचं वातावरण पहायला मिळालं आहे. आज (23 मे) शेअर बाजार (Share Market) 600 अंकांनी अधिकने उघडला आहे. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा 40,000 च्या पार गेला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये आजही उत्साह कायम आहे. एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?
ANI Tweet
यंदा 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. 11 एप्रिल ते 19 मे या काळात हे मतदान सात टप्प्यांमध्ये भारतामध्ये पार पडलं. तर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. आज निवडणूक मतदानाची मतमोजणी सुरू आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)