Lok Sabha Elections 2019: बोटावरील शाई कशी काढायची? गुगल सर्चच्या माध्यमातून भारतातील लोक शोधतायत उपाय

देशात आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

Lok Sabha Elections 2019: बोटावरील शाई कशी काढायची? गुगल सर्चच्या माध्यमातून भारतातील लोक शोधतायत उपाय
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: देशात आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे 91 मतदारसंघामध्ये पार पडणार आहे. तसेच मतदानाबद्दल नागरिक अधिक उत्सुक असून मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी रांगा दिसून येत आहेत. परंतु मतदान केल्यानंतर लावण्यात आलेली शाई कशी काढावी याबद्दल भारतातील लोक गुगलवर अधिक सर्च करत असल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसून आले आहे.

गुगल ट्रेण्डने दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल पासूनच लोक 'How to remove vote ink' नावाने गुगलवर सर्च करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजसुद्धा सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर बोटावर लावलेली शाई कशी काढावी याबद्दल अधिक सर्च करण्यात येत आहे. तर दुपारनंतर हा आकडा अधिकच वाढला असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे.(हेही वाचा-How to Vote India Google Doodle: लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान कसं कराल हे सांगणारं 'गूगल'चं खास डूडल)

तर देशातील दक्षिण राज्यात शाई कशी काढावी याबद्दल खुप लोकांनी सर्च केले असून सर्च करण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढले आहे. त्याचसोबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील सर्व लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. मात्र बोगस मतदानापासून सावध राहण्यासाठी निवडणुक आयोगाने अनेक उपाय केले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2019 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).