Lok Sabha Elections 2019: बीएसफच्या माजी जवानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणुक लढवण्याची इच्छा
सीमा सुरक्षा दलामधील (BSF) माजी जवानाला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणुक लढवण्याची इच्छा आहे.
Lok Sabha Elections 2019: सीमा सुरक्षा दलामधील (BSF) माजी जवानाला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरुद्ध निवडणुक लढवण्याची इच्छा आहे. तर सैनिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत तक्रार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने या माजी जवानाला 2017 साली दलातून काढण्यात आले होते. त्यामुळे आता वाराणसी येथून त्याला मोदी यांच्या विरुद्ध निवडणुक लढवायची आहे.
तेजबहादूर यादव असे माजी जवानाचे नाव आहे. वाराणसी येथून निवडणुक लढवण्याची इच्छा असल्याने त्याने हरयाणामधील रेवडी येथे पत्रकारांना सांगितले आहे. त्याचसोबत सैन्यदलात खुप भ्रष्टाचार होत असल्याने तो हटवण्यासाठी मला निवडणुक लढवायची आहे असे यादव यांनी म्हटले आहे. मी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज उठवल्याने मला दलातून काढून टाकले. (हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाही, अमित शहा यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय: उद्धव ठाकरे)
2017 रोजी यादव यांनी सैन्य दलात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर बेशिस्तीच्या आरोपाखाली यादव यांना सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आले होते.