प्रचाराच्या वेळी जवानांचे फोटो वापरु नये, निवडणुक आयोगाचे आदेश
परंतु राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकांबद्दल तयारी सुरु झाली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकांबद्दल तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभुमीवर आता निवडणुक आयोगाने जवानांचे फोटो प्रचारावेळी वापरु नये असे आदेश दिला आहे. शनिवारी निवडणुक आयोगाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.
निवडणुक आयोगाकडून स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांना आगामी निवडणुकीच्या प्रचारात लष्करी अधिकारी किंवा जवानांचे फोटो वापरण्यास मनाई असलेले पत्र पाठविले आहे. तसेच संरक्षण दलामधील सुद्धा कोणत्याही व्यक्तीचा फोटो निवडणुकीच्या प्रचारात न वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. (हेही वाचा-5 वर्षात सीमेबाहेर 3 वेळा वायुसेनेची यशस्वी कामगिरी, पाकिस्तान मध्ये खळबळ - राजनाथ सिंह)
तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विंग कमांडर, पाकिस्ताचे विमान अशा घटनांवर भाष्य करणारे पोस्टर नेत्यांनी झळकवल्याने निवडणुक आयोगाने या निर्णयाचे आदेश दिले आहेत.