Anantkumar Hegde: अनंत कुमार हेगडे यांना भाजपचा झटका, भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा भोवली, उमेदवार यादीतून डच्चू
भाजप (BJP) नेते. एक दोन नव्हे तर तब्बल सलग चार वेळा लोकसभा खासदार. या वेळी मात्र त्यांच्या खासदारकीला मोठा गतीरोध लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत (Karnataka BJP Lok Sabha List) त्यांचे नाव नाही.
Lok Sabha Election 2024: अनंत कुमार हेगडे (Anant Kumar Hegde). भाजप (BJP) नेते. एक दोन नव्हे तर तब्बल सलग चार वेळा लोकसभा खासदार. या वेळी मात्र त्यांच्या खासदारकीला मोठा गतीरोध लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत (Karnataka BJP Lok Sabha List) त्यांचे नाव नाही. ते ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्या ठिकाणाहून भाजपने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. हेगडे यांनी अलिकडेच भाजप सत्तेत आला तर भारतीय सविधान बदलले जाईल, असे जाहीर विधान केले होते. संविधान बदलण्यासाठीच आपल्याला 400 पार इतक्या खासदारांचे बहुसंख्येचे बहुमत हवे असल्याचे सांगत आपल्या विधानाचे समर्थनही केले होते. त्यांच्या या विधानावरुन जोरदार वाद निर्माण झाला होता. विरोधकांनीही भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला आगोदरच एक झटका बसला आहे. त्यातच पुन्हा लकसभा निवडणुकीत आणखी नवे आव्हान नको यासाठी भाजपलने त्यांना तिकीट डावलून डॅमेज कंट्रोल केल्याचे बोलले जात आहे.
अनंत कुमार हेगडे हे भाजप तिकीटावर उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघातून पाठिमागील सलग 28 वर्षे खासदार म्हणून निवडून येत आहेत. ज्यामध्ये त्यांच्या सलग चार वेळच्या विजयाचा समावेश आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अलिकडेच त्यांनी भारतीय राज्यघटना बदलण्याचे जाहीर विधान केले आणि नव्या वादाला तोंड फोडले. पक्षाने वारंवार सूचना देऊनही आपली वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवणाऱ्या हेगडे यांना पक्षाने धक्का दिला आहे. या धक्याच्या निमित्ताने वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा कडक अन्यथा कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही पक्षाने नेत्यांना दिला आहे. (हेही वाचा, Kangana Ranaut Joins BJP: अभिनेत्री कंगना राणौत भाजपमध्ये शामिल, मंडीमधूल लढवणार निवडणूक)
अनंतकुमार हेगडे यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना 'हिंदुंवर अत्याचार' करण्यासाठी संविधान बदलण्याचा आरोप करत त्यांनी संविधान पुन्हा एकदा नव्याने लिहिण्याची गरज असल्याचे म्हटले होते. जर संविधनामध्ये सुधारणा करायची आहे. कारण काँग्रेस पक्षाने त्यात अनावश्यक गोष्टींची भर घालून ते विकृत केले आहे. कास करुन असे कायदे निर्माण केले आहेत ज्याचा उद्देशच मुळात हिंदू समाजाला दबावात ठेवणे हा आहे. जर ते (संविधान) बदलायचे असेल तर बहुमत आवश्यक आहे. आता जेवढे आहे तेवढे बहुमत कामाचे नाही. ते वाढायला हवे. (हेही वाचा, Loksabha Election 2024: काँग्रेसची सहावी यादी आली समोर! 'या' पाच जागांवरील उमेदवार जाहीर)
दरम्यान, हेगडे यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवताच हेगडे काहीसे बॅकफूटवर गेले. त्यांनी संविधानाबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षाची भूमिका नसून ते आपले व्यक्तीगत मत असल्याचे सांगत त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.