Lok Sabha Election 2024 : माजी कर्णधार राहुल द्रविडने बजावला मतदानाचा हक्क; प्रथम मतदारांसह तरुणांना मतदान करण्याचे केले आवाहन

बेंगळुरू येथे माजी कर्णधार आणि क्रिकेटर राहुल द्रविड याने मतदानाचा हक्क बजावला.

Photo Credit -X

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी देशभर मतदान होत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटर राहुल द्रविड(Rahul Dravid) याने मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बेंगळुरू (Bengaluru)येथे मतदान केले. नव्या वोटर्सना आणि तरूणांना राहुल द्रविड याने मतदान करण्याची विनंती केली. (हेही वाचा :Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन )

बेंगळुरूमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची अपेक्षा राहुल द्रविडने व्यक्त केली. “मला बेंगळुरूमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानाची अपेक्षा आहे. प्रथमच मतदान करणारे बरेच आहेत आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क वापरला पाहिजे. जर तरुण मुले आणि मुलींनी मतदान केले तर ते खूप चांगले होईल,” राहुल द्रविड पुढे म्हणाला.

“मतदान सुरळीत पार पडले आणि प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपली लोकशाही पुढे नेणे महत्त्वाचे आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की बाहेर पडून मतदान करावे, असे राहुल द्रविड म्हणाला.