Lok Sabha Election 2024 Counting and Exit Polls Results: लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी आणि एक्झिट पोल्स निकाल; कधी, कुठे, कसे पाहाल? घ्या जाणून

अर्थात जनमत चाचण्या म्हणजे काही निवडणुकीचा निकाल नसतो. मात्र, जनतेच्या मनात काय याबाबतचा काहीसा अंदाज येण्यास या चाचण्यामुळे मदत होते. या चाचण्यांचे निकाल आपण कधी, कुठे आणि कसे पाहाल? घ्या जाणून.

Lok Sabha Exit Poll Results | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीच्या 2024 साठी सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज (शनिवार, 1 जून) पार पडत आहे. ज्याची मतमोजणी (Lok Sabha Election 2024 Counting) 4 जून रोजी पार पडणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपेल. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता विविध माध्यमसंस्था आणि स्वतंत्र संस्थांनी घेतलेल्या जनमताचा कौल म्हणजेच एक्झिट पोल्स निकाल (Lok Sabha Election 2024 Exit Polls Results) जाहीर होतील. अर्थात जनमत चाचण्या म्हणजे काही निवडणुकीचा निकाल नसतो. मात्र, जनतेच्या मनात काय याबाबतचा काहीसा अंदाज येण्यास या चाचण्यामुळे मदत होते. या चाचण्यांचे निकाल आपण कधी, कुठे आणि कसे पाहाल? घ्या जाणून.

लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजता संपेल. हे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व 543 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदानाची समाप्ती दर्शवते. (हेही वाचा, Bihar Lok Sabha Election 2024: बिहार मध्ये कुटुंबाने आईच्या अंत्यविधी आधी दिलं मतदानाला प्राधान्य)

मतदानाच्या टप्प्यांचा आढावा

निवडणूक निकाल आणि एक्झिट पोल

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसोबतच देशामध्ये काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी लोकसभेसोबतच झालेल्या मतदानाची मतमोजणीसुद्धा चार जून रोजीच पार पडणार आहे. देशभरातील जनतेच्या नजरा या निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत. निकालाबाबतची उत्कंटा कायम असताना जनमताचा कानोसा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून लोकांना घेता येऊ शकतो.

महत्त्वाची टीप: एक्झिट पोल ऐतिहासिकदृष्ट्या काही वेळा चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे एक्झिट पोल्स अंदाजादरम्यान येणाऱ्या बातम्या, आकडेवारी आणि जनमताकल जाणून घेताना सावधगिरीने त्याचा अर्थ लावला पाहिजे.