Lok Sabha Election 2024: लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशभरात 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 11 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.

votes | File Image प्रतिकात्मक प्रतिमा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सांगता झाली. देशभरात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. महाराष्ट्रातही आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनेक नेत्यांचा वेगवेगळ्या भागात प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला.. महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.. या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती, रायगड, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी—सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा यात समावेश आहे. (हेही वाचा - Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हेकडून थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न)

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 11 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेय. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुती आणि मविआच्या दिग्गज नेत्यांनी अकराही मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला होता. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीसुद्धा आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता तर मविआच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रचाराचा जोर लावला होता.

तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील 14, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8 आणि छत्तीसगडमधील 7 मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात 10 जागांवर हाय प्रोफाईल लढती होत आहेत.  आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. सात तारखेला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे आता मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत टाकतोय, हे पाहावं लागणार