Coronavirus संकटावर Lockdown हा उपाय नाही, केवळ चाचणी हाच पर्याय; माझ्या बोलण्याकडे टीका नव्हे सूचना म्हणून पाहा - राहुल गांधी
लॉकडाऊन केल्याने परिस्थिती बदलली नाही. लॉकडाऊन वाढवावा लागला. केंद्र सरकारने राज्यांना अधिक अधिकार द्यायाला हवेत. राज्यांचा राहिलेला जीएसटीचा पैसा केंद्राने परत करावा. जिल्हा स्तरावर काम करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस (Congress) पक्ष माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि देशातील लॉकडाऊन याबाबत आपली भूमीका मांडली. व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारामाध्यमांशी संवाद साधला. माझे बोलणे हे केवळ टीका म्हणून न घेता त्याकडे सूचना म्हणून पाहा. मी अनेक तज्ज्ञांशी बोलून माहिती घेतली आहे, असे सुरुवातीलाच स्पष्ट करत राहुल यांनी संवादास सुरुवात केली. लॉकडाऊन हा कोरोना व्हायरस संकटावरील उपाय नाही. जास्तीत जास्त चाचण्या करणे हाच यावरील सध्यास्थितीत आपल्याकडे पर्याय आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य सुविधा वाढवणे. योग्य वेळेत योग्य ठिकाणी कोरोना व्हायरस चाचण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.
या वेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले सध्या देशात अत्यंत आणिबाणीची स्थिती आहे. ही स्थिती विचारात घेऊन संर्व भारतीयांनी एकत्र येत काम करायला हवे. यामुळे देशाला मोठा फायदा होईल. राजकारण दूर ठेऊन आपण काम करायला हवे. लॉकडाऊन केल्याने परिस्थिती बदलली नाही. लॉकडाऊन वाढवावा लागला. केंद्र सरकारने राज्यांना अधिक अधिकार द्यायाला हवेत. राज्यांचा राहिलेला जीएसटीचा पैसा केंद्राने परत करावा. जिल्हा स्तरावर काम करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. जसजसा हा आजार वाढू लागला आहे तसतसे जगभरातील देशांतून चाचण्यांची मागणी वाढत आहे. भारतानेही ती वाढवायला हवी. आपण कोविड विरुद्ध लढतो आहोत. मात्र, चाचण्यांशिवाय हा लढा अपूर्ण आहे. आपण केवळ हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी चाचणी करत आहोत. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळणे कठीण आहे. आपल्याला चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. नॉन हॉटस्पॉट परिसरातही आपल्याला चाचण्या कराव्या लागतील, असेही राहूल गांधी यांनी या वेळी म्हटले.